News Flash

मलायकाने शेअर केला बिकिनी फोटो, सोशल मीडियावर व्हायरल

सध्या हा फोटो चर्चेत आहे.

अभिनेत्री मलायका अरोरा सध्या चित्रपटांमध्ये दिसत नसली तरी ती कोणत्या ना कोणत्या कारणामुळे कायमच चर्चेत असते. मलायका सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. ती सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात असल्याचे दिसते. नुकताच मलायकाचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

व्हायरल झालेला हा फोटो मलायकाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. हा फोटो गोव्यातला आहे. मलायका गोव्याला नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी आणि सुट्टीचा आनंद घेण्यासाठी गेली होती. या फोटोत मलायका स्विमिंग पूल मध्ये असल्याचे दिसते. मलायकाने प्रिंटेड बिकिनी परिधान केली आहे. “सुप्रभात तुमचा दिवस सुंदर आणि आरोग्यमय जाओ” अशा आशयाचे कॅप्शन मलायकाने त्या फोटोला दिले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Malaika Arora (@malaikaaroraofficial)

दरम्यान, मलायकाच्या फोटोवर नेटकऱ्यांनी कमेंट आणि लाइकचा वर्षाव केला आहेत. एक नेटकरी म्हणाला, “अतिसुंदर.” तर दुसरा नेटकरी म्हणाला, “तू खूप सुंदर आहेस.” मलायका आपल्या फिटनेसच्या बाबतीत खूप जागरूक आहे. ती नेहमीच सोशल मीडियावर योग किंवा फिटनेस टिप्स देताना दिसते. तिच्या टिप्स चाहते फॉलो करताना देखील दिसतात.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 19, 2021 7:38 pm

Web Title: malaika arora shared a hot photo on social media went viral dcp 98 avb 95
Next Stories
1 नट्टू काकांना येते दया बेनची आठवण, म्हणाले..
2 तैमूरनंतर सोशल मीडियावर सुरु आहे ‘या’ स्टार किडची चर्चा
3 सलमानच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी; ईदला रिलीज होणार ‘राधे’ चित्रपट
Just Now!
X