News Flash

मलायका अरोराच्या आईला पाहिलेत का?

मदर्स डे निमित्त मलायकाने आईसोबत फोटो शेअर केला आहे.

मलाइका अरोरा फोटो सौजन्य- इंस्टाग्राम

आज १० मे रोजी ‘मदर्स डे’ मोठ्या उत्साहत साजरा केला जात आहे. आईची महती किंवा प्रेम हे शब्दात व्यक्त करता येत नाही असे बऱ्याच वेळा म्हटले जाते. पण आईप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ‘मदर्स डे’ मोठा उत्साहत साजरा केला जातो. प्रत्येकजण जमेल त्या पद्धतीने आईवरील प्रेम आणि आदर व्यक्त करण्याचा प्रयत्न करत आहेत. यामध्ये सेलिब्रिटीही मागे नाहीत. अनेक सेलिब्रिटींनी आपल्या आईसोबत फोटो शेअर करत खास संदेश लिहित आहेत. यामध्ये बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोराचाही समावेश आहे.

मलायकाने आई जॉइस पालीकार्पसोबत इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये मलायकाने बिकीनी परिधान केली असून दोघीही फोटोमध्ये अत्यंत सुंदर दिसत आहेत. तर जॉइस या सेल्फी घेताना दिसत आहेत.

हा फोटो शेअर करत मलायकाने छान असे कॅप्शन दिले आहेत. ‘जेव्हा आपण बी पेरतो तेव्हा त्याचे मोठ्या झाडामध्ये रुपांतर होण्यासाठी आपल्याला त्याची काळजी घ्यावी लागते. त्याला वाढवण्यासाठी पाणी, हवा आणि सूर्यप्रकाशाची गरज असते. आपल्याला हे सगळं केवळ आपली आईच देऊ शकते. ती आपल्यासाठी सर्वकाही असते’ असे तिने कॅप्शनमध्ये लिहित आईला ‘मदर्स डे’च्या शुभेच्छा दिल्या आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 10, 2020 6:50 pm

Web Title: malaika arora shared her mother joyce polycarp photo on mothers day avb 95
Next Stories
1 शेजारच्या व्यक्तीला करोना झाल्याचे कळताच अशी होती शिल्पाच्या नवऱ्याची प्रतिक्रिया
2 लॉकडाउनमुळे परदेशात अडकलेल्या अभिनेत्रीला तब्बल दोन वर्षांनंतर आईने केला फोन
3 करोना व्हायरसशी संबंधीत आहे केबीसी रेजिस्ट्रेशनचा पहिला प्रश्न
Just Now!
X