News Flash

चिमुकल्या अरहानसोबतचा जुना फोटो मलायकाने केला शेअर

फेमेनिया इंडियाच्या मुखपृष्ठावर मलायका हटके अंदाजात झळकली होती.

मलायका अरोरा चिमुकल्या अरहानसोबतचा फोटो. (छाया सौजन्य इन्स्टाग्राम)

बॉलिवूडची अभिनेत्री मलायका अरोरा वैवाहिक जीवनातील घडामोडीमुळे काही दिवसांपासून चांगलीच चर्चेत आहे. अरबाज खानसोबत काडीमोड घेण्याच्या निर्णयावर मला तुमचे नाक माझ्या आयुष्यात खुपसलेले दिसते, असे म्हणणाऱ्या मलायकाने पुन्हा एकदा सोशल मीडियावरुन चाहत्यांसाठी एक फोटो शेअर केला आहे. तिने मुलगा अरहानसोबतचा एक जुना फोटो सोशल मीडियावर शेअर करत जुन्या आठवणींना उजाळा देण्याचा प्रयत्न केल्याचे दिसते. अरबाज आणि मलायका यांचा मुलगा अरहान आता १४ वर्षाचा असून तिने चिमुकल्या अरहान सोबतचा फोटो शेअर करुन जुन्या आठवणींना उजाळा दिल्याचे दिसते. अरहानच्या जन्मावेळी म्हणजेच २००२ मध्ये मलायकाने तिच्या चिमुकल्या मुलासोबत फोटोशूट केले होते. या फोटोमध्ये मलायका हॉट अंदाजात दिसली होती. या फोटोमध्ये मलायकाने चिमुकल्या अरहानला कवटाळले असल्याचे दिसते . एका प्रसिद्ध मासिकासाठी तिने हे फोटोशूट १४ वर्षांपूर्वी केले होते.

या फोटोवर त्यावेळी संमिश्र प्रतिक्रिया देखील उमटल्याचे पाहायला मिळाले होते.  मात्र आजही मलायकाने तिच्यातील वैयक्तिक मताशी तडजोड न करता सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. इन्टाग्रामवरुन मुलासोबतचा फोटो शेअर करताना आतापर्यंतचा सर्वात आवडता फोटो असल्याचा उल्लेख देखील मलायकाने केला आहे. फेमेनिया इंडियाच्या मुखपृष्ठावर मलायका या हटके अंदाजात झळकली होती.

बॉलिवूड अभिनेता अरबाज खान आणि मलायका अरोरा या दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतल्यानंतर सर्वांनाच धक्का बसला होता. बॉलिवूड अभिनेता अरबाज खान आणि मलायका अरोरा खान यांनी जेव्हा वेगळे राहणे सुरु केले, तेव्हाच त्यांच्या विभक्त होण्याच्या बातम्यांना उधाण आले होते. त्यानंतर मलायका अरोरा आणि अरबाज खानच्या घटस्फोटाची चर्चा रंगली. अखेर तब्बल १८ वर्षांच्या संसारानंतर या दोघांनी एकमेकांच्या सहमतीने वेगळे होण्यासाठी कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला आहे.

त्यानंतर मलायकाने घटस्फोटातील पोटगीच्या रकमेसाठी जवळपास १० ते १५ कोटी रुपयांची मागणी केल्याचे वृत्ताचीही चांगलीच चर्चा रंगली होती. मात्र हे वृत्त अफवा असल्याचे बोलले गेले. दोघांच्या विभक्त होण्याच्या जेवढ्या चर्चा रंगल्या तेवढ्याच चर्चा ही जोडी एकत्र दिसल्यानंतर रंगल्या. ही जोडी जेव्हा एकत्र दिसते त्यावेळी दोघांच्यातील दुरावा कमी होणार अशा चर्चांना देखील उधाण आल्याचे पाहायला मिळाले. मलायका आणि अरबाजने गोव्यात एकत्र नवीन वर्षाचे स्वागत केले होते. त्यामुळे त्यांचा घटस्फोट जरी होत असला तरी त्यांच्यात मैत्रीचे संबंध राहतील हे दिसून येते. मलायकाची बहिण अमृता अरोरा हिने इन्स्टाग्रावर पार्टीचे फोटो शेअर केले होते. त्यात मलायकासोबतअरबाजही दिसला होता. दरम्यान, अरबाज आणि मलायका विभक्त होण्याच्या निर्णयामध्ये अरबाज-मलायकामध्ये तिसरा व्यक्ती आल्याची चर्चादेखील रंगल्या होत्या. बॉलिवूडची जोडी फुटण्यामागे अर्जुन कपूर असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. अर्जुन आणि मलायका अरोरा खानमधील वाढत्या मैत्रीमुळे ती अरबाजपासून दूर होत असल्याचे वृत्त चर्चेत होते.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 16, 2017 5:18 pm

Web Title: malaika arora shares bold and beautiful picture with son arhaan
Next Stories
1 Zaira Wasim: झायरा वसिमच्या माफीनाम्यावरून सोशल मीडियावर ‘दंगल’
2 ‘रीलोडेड बॉय’ बर्थडे सेलिब्रेशनसाठी तयार
3 दीपिकासह विन डिझेलने घेतला मुंबईच्या ‘कटिंग चाय’चा स्वाद
Just Now!
X