19 September 2020

News Flash

कमाल झाली… पाणी कसं प्यावं हे सांगणाऱ्या मलायकाच्या ‘या’ व्हिडिओला आठ लाख व्ह्यूज

मलायका चाहत्यांना शिकवतेय पाणी कसं प्यायचं?

बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या फोटो आणि व्हिडीओजच्या माध्यमातून ती कायम चर्चेत असते. यावेळी मलायका आपल्या चाहत्यांना पाणी कसं प्यायचं? हे शिकवत आहे. तिचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

अवश्य पाहा – हिंदुस्तानी भाऊला ISI ने दिली जीवे मारण्याची धमकी; ट्विटरद्वारे धक्कादायक आरोप

मलायकाने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओद्वारे तिने पाणी पिण्याची योग्य पद्धत आपल्या चाहत्यांनी शिकवली आहे. “पाणी नेहमी खाली शांत बसून प्यावे. कितीही घाई असली तरी उभं राहून पाणी पिणं टाळा. वैज्ञानिक संशोधनामध्ये सिद्ध झालंय की उभं राहून पाणी पिणं शरीरासाठी हानिकारक आहे. त्यामुळे निरोगी राहण्यासाठी भरपूर पाणी प्या. पण खाली शांत बसून.” असा उपदेश आपल्या चाहत्यांना मलायकाने या व्हिडीओमधून केला आहे.

अवश्य पाहा – अक्षय कुमारने घराणेशाहीवर साधला निशाणा; मुलगा आरवला दिला सूचक इशारा, म्हणाला…

मलायका आरोराचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. आश्चर्याची बाब म्हणजे काही तासांत सात लाखांपेक्षा अधिक वेळा हा व्हिडीओ पाहिला गेला आहे. तसेच शेकडो नेटकऱ्यांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. यापूर्वी मलायका टिक-टॉक अॅप बॅन केल्यामुळे चर्चेत होती. तिने या निर्णयासाठी सरकारचे कौतुक केले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 1, 2020 3:22 pm

Web Title: malaika arora shares the correct way to drink water mppg 94
Next Stories
1 अभिनयानंतर विवेक ओबेरॉयची निर्मिती क्षेत्राकडे वाटचाल; ‘या’ चित्रपटापासून करणार श्रीगणेशा!
2 हिंदुस्तानी भाऊला ISI ने दिली जीवे मारण्याची धमकी; ट्विटरद्वारे धक्कादायक आरोप
3 आमिर खानच्या आईचा करोना रिपोर्ट आला, अभिनेत्यानं टि्वटरवर दिली माहिती
Just Now!
X