27 September 2020

News Flash

अर्जुनसोबत लग्न करणार का? वाचा मलायका काय म्हणते

मलायकाने २०१७ मध्ये पती अरबाज खानसोबत घटस्फोट घेतला

अर्जुनसोबत लग्न करणार का? वाचा मलायका काय म्हणते

गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री मलायका अरोरा आणि तिचा कथित बॉयफ्रेंड अभिनेता अर्जुन कपूर यांच्या लग्नाची सर्वत्र चर्चा सुरू आहे. सुट्ट्यांचा आनंद लुटण्यासाठी नुकतीच मलायका मैत्रिणींसह मालदीवला फिरायला गेली होती. तिथे मलायकाच्या गर्ल्सगॅंगला अर्जुन भेटला असल्याचे म्हटले जात आहे. इतकंच नव्हे तर ही मलायकाची बॅचलर पार्टी असून ती अर्जुनसह लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याचे म्हटले जात आहे. आता चाहत्यांना उत्सुकता आहे ती मलायका आणि अर्जुनच्या लग्नाची.

अर्जुन आणि मलायका १८ ते २२ एप्रिल या दरम्यान लग्न बंधनात अडकणार असल्याचे म्हटले जात आहे. हा चाहत्यांसाठी सुखद धक्काच असणार आहे. तसेच त्यांचा लग्नसोहळा गोवा येथे पार पडण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे. नुकतीच ‘बॉम्बे टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये ‘या सर्व अफवा आहेत’ असे मलायका म्हणाली. अर्जुन आणि मलायकाला अनेकदा एकत्र पाहण्यात आले होते. परंतु त्या दोघांनीही त्यांच्या नात्याची कबुली अद्याप दिलेली नाही.

मलायकाने २०१७ मध्ये पती अरबाज खानसोबत घटस्फोट घेतला. त्यानंतर ती अभिनेता अर्जुन कपूरला डेट करू लागली. त्यानंतर गेल्या काही दिवसांपूर्वी मलायका आणि अर्जुन १९ एप्रिलला विवाहबंधनात अडकणार असल्याची चर्चा होती. तसेच लग्नासाठी केवळ मलायका आणि अर्जुनचे निकटवर्तीयच उपस्थित राहणार असून या यादीत करिष्मा, करिना, दीपिका, रणवीर या कलाकारांचा समावेश असल्याचे म्हटले जात होते. दोघेही ख्रिश्चन पद्धतीने लग्न करणार असल्याच्याही चर्चा सुरू होत्या. परंतु मलायकाने या सर्व चर्चा खोट्या असल्याचे स्पष्ट केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 15, 2019 10:33 am

Web Title: malaika arora spoke about her marriage
Next Stories
1 ‘ब्रुस ली’च्या जीवनावर शेखर कपूर बनवणार चित्रपट
2 ‘बाबासाहेबांना देव करून त्यांची मंदिरं करायच्या आधी…’
3 ‘गेम ऑफ थ्रोन्स’… ही नक्की भानगड आहे तरी काय?
Just Now!
X