बॉलिवूडमधील फिट आणि हिट म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री म्हणजे मलायका अरोरा. वय हा केवळ आकडा आहे हे मलायकाकडे पाहिल्यावर लक्षात येतं. मलायका कायम तिच्या फिटनेसमुळे चर्चेत येत असते. त्यातच गेल्या काही दिवसांपासून ती सतत चर्चेत येत आहे. बऱ्याच वेळा अर्जुन कपूरमुळे चर्चेत येणारी मलायका यावेळी नेहा धुपियामुळे चर्चेत आली आहे. एका शोदरम्याने मलायकाने नेहाला चप्पल मारण्याचा प्रयत्न केल्यामुळे ती चर्चेत आली आहे. सध्या या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत असून मलायकाने स्वत: हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.
नेहा धुपियाचा नो फिल्टर या शोमध्ये आजवर अनेक कलाकारांनी हजेरी लावली असून यंदाच्या चौथ्या सिझनमध्ये मलायकाने हजेरी लावली होती. या शोमध्ये या दोघींनी प्रचंड मजा-मस्ती केल्याचं पाहायला मिळालं. ही मजा-मस्ती सुरु असतानाच मलायकाने नेहाला मारण्यासाठी चप्पल दाखविली. विशेष म्हणजे या घटनेचा व्हिडीओ वाऱ्यासारखा पसरलं. मात्र मलायकाने मस्करीमध्ये नेहाला चप्पल दाखविली. कोणत्याही रागात किंवा जाणूनबुजून मलायकाने ही कृती केली नसून हा संपूर्ण मजेचा भाग होता.
View this post on Instagram
With the goddess who is born ready! @malaikaaroraofficial … link in bio … listen up now
दरम्यान, मलायकाने तिच्या करिअरची सुरुवात व्हिडीओ जॉकी म्हणून केली होती. त्यानंतर तिचं बॉलिवूडमध्ये पदार्पण झालं. या क्षेत्रात आल्यानंतर तिने अभिनेता अरबाज खानसोबत लग्न केलं. मात्र १८ वर्ष संसार केल्यानंतर २०१७ मध्ये त्यांनी घटस्फोट घेतला. त्यानंतर मलायका अर्जुन कपूरला डेट करत आहे.
First Published on November 16, 2019 3:43 pm