17 January 2019

News Flash

‘कतरिनाला इतक्या वर्षांत जमलं नाही ते प्रियाने काही मिनिटांत केलं’

...म्हणून प्रियाशी जोडलं जातंय कतरिनाचं नाव

प्रिया वरियर, कतरिना

मल्याळम चित्रपटसृष्टीच्याच चर्चा सध्या सोशल मीडियावर रंगण्यास सुरुवात झाली आहे. या चर्चा रंगण्यास निमित्त ठरलंय एक गाणं आणि त्या गाण्यात दिसणारी नवोदित अभिनेत्री. ‘उरू अदार लव्ह’ या चित्रपटातील ‘मनिक्य मलरया पूवी’ (Manikya Malaraya Poovi) या गाण्यामुळे मल्याळम अभिनेत्री प्रिया प्रकाश वरियर अनेकांच्या काळजाचा ठोका चुकवून गेली. प्रियाच्या खोडकर अदा आणि तिच्या हसण्यावर नेटकरी गारद झाले आहेत असंच म्हणावं लागेल. अवघ्या काही सेकंदांसाठी दिसलेल्या या अभिनेत्रीच्या चेहऱ्यावर असलेले निरागस भाव पाहून ‘व्हॅलेंटाइन डे’पूर्वीच अनेकांनी तिच्यावरील प्रेमाची कबुली दिली.

प्रियाची झलक असणारा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर तिचे काही फोटो आणि मीम्सही व्हायरल झाले. नेटकऱ्यांनी तिच्याविषयी प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली. कोणी तिच्या हसण्याची, नजरेची तर कोणी तिच्या अभिनय कौशल्याची प्रशंसा करण्यास सुरुवात केली. काही युजर्सनी यामध्ये विनोदी तडका दिला. काहींनी तर या साऱ्यामध्ये अभिनेत्री कतरिना कैफचं नावही गोवलं. तिचा इथे काही संबंध नसतानाही अभिनय कौशल्याच्या मुद्द्यावरुन काही नेटकऱ्यांनी प्रिया आणि कतरिनाची तुलना करण्यास सुरुवात केली.

…तर नजरेने घायाळ करणारी प्रिया इतकी लोकप्रिय झालीच नसती

एका युजरने केलेल्या ट्विटमध्ये त्याने असं म्हटलं की, ‘प्रिया प्रकाश वरियरने काही मिनिटांतच इतक्या प्रकारचे भाव व्यक्त केले आणि असा काही अभिनय केला, जे कतरिनाला तिच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीत करणंही जमलं नाही.’ या ट्विटला आतापर्यंत ६ हजारहून अधिक युजर्सने लाइक केलं असून, अनेकांनी ते रिट्विटही केलं आहे. पण, काही युजर्सनी मात्र या ट्विटवर हरकत दर्शवल्याचं पाहायला मिळालं. कतरिना आणि प्रियामध्ये करण्यात आलेली ही तुलना निरर्थक असल्याच्या प्रतिक्रियाही अनेकांनी दिल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे प्रिया वरियरच्या व्हायरल व्हिडिओ प्रकरणाला सोशल मीडियावर बरेच फाटे फुटले असं म्हणायला हरकत नाही.

वाचा : पुरुष कलाकारांनी कमी मानधन आकारावं- दीपिका पदुकोण

First Published on February 13, 2018 5:07 pm

Web Title: malayalam actress priya prakash varrier effect bollywood actress katrina kaif is also accidentally viral song video manikya malaraya poovi