18 February 2019

News Flash

‘नॅशनल क्रश’ प्रिया वरियरचे मुंबई कनेक्शन माहित आहे का?

सध्या प्रिया गर्ल्स कॉलेजमध्येच शिकते

नॅशनल क्रश म्हणून प्रसिद्ध झालेली मल्याळम अभिनेत्री प्रिया वरिअरचीच सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे. फेसबुक अकाऊंट सुरू केल्यावर पहिल्या १० व्हिडिओंपैकी सात ते आठ व्हिडिओ हे प्रियाचेच असतात. आपले प्रेम डोळ्यांच्या हावभावातून व्यक्त करणाऱ्या प्रियाच्या त्या व्हिडिओचे अनेक मिम्सही झाले. अवघ्या एका दिवसात तिला इन्स्टाग्रामवर ६ लाखांहून अधिक लोकांनी फॉलो केले. जगभरात इन्स्टाग्रामवर एका दिवसात सर्वात जास्त फॉलोवर्स मिळवणाऱ्या सेलिब्रिटींच्या यादीत आता ती तिसऱ्या स्थानावर आहे.

आपल्या खाजगी आयुष्याबद्दल प्रसारमाध्यमांशी बोलताना प्रियाने तिचे मुंबई कनेक्शनही सांगितले. प्रियाचा जन्म केरळमध्ये झाला असला तरी बालपणीचा काळ तिचा मुंबईत गेला आहे. तिचे प्राथमिक शिक्षण मुंबईत झाले आहे. प्रियाचे वडील प्रकाश वरियर सेंट्रल एक्साइज डिपार्टमेण्टमध्ये काम करतात. मुंबईत काही वर्ष नोकरी केल्यानंतर प्रकाश यांनी केरळमध्ये बदली करुन घेतली. सध्या ती वाणिज्य शाखेच्या पहिल्या वर्षात शिकत आहे. प्रिया आई- बाबा, छोटा भाऊ आणि आजी- आजोबा अशा माणसांनी भरलेल्या घरात राहते.

Priya Prakash प्रिया

तिच्या व्हॅलेंटाइनबद्दल बोलताना प्रिया म्हणाली की, ‘मी सध्या गर्ल्स कॉलेजमध्येच शिकते. कॉलेजमध्ये मुलगाच नसल्याने क्रशचा प्रश्नच येत नाही.  त्यामुळे सध्या कोणाला करायचे झालेच तर सिनेमातील हिरो रोशन अब्दुल रहूफच माझा व्हॅलेंटाइन होईल.’ प्रियाला संगीत आणि नृत्य या दोन्ही गोष्टींमध्ये कमालिचा रस आहे. तिने मोहिनीअट्टम या शास्त्रीय नृत्याचे प्रशिक्षण घेतले असून गायनाचेही ती प्रशिक्षण घेत आहे. तिला बॉलिवूड गायकांमध्ये अरिजीतचा आवाज फार भावतो. त्यातही अरिजीतचे ‘चन्ना मेरेया’ हे गाणे सर्वाधिक आवडते.

१८ वर्षीय प्रिया केरळमधील त्रिशूर येथे राहते. प्रिया आगामी ‘उरू अदार लव्ह’ या सिनेमातील ‘मनिक्य मलरया पूवी’ (Manikya Malaraya Poovi) या गाण्यामुळे अनेकांच्या हृदयाचा ठोका चुकवून गेली. आतापर्यंत युट्यूबवर प्रियाच्या गाण्याला ५,२०४,८३१ इतके व्ह्यूज मिळाले असून अनेकांनी ते शेअरही केले आहे. आपल्यावर प्रेमाचा वर्षाव करणाऱ्या सर्व चाहत्यांचे प्रियाने तिच्या ट्विटर अकाऊंटवरून आभारही मानले आहेत.

First Published on February 14, 2018 2:36 pm

Web Title: malayalam actress priya prakash varrier mumbai connection biography