News Flash

Video : त्याच कारणासाठी पुन्हा एकदा प्रिया- रोशन आले एकत्र

या नव्या व्हिडिओतील प्रियाचा अंदाज नेटकऱ्यांना भावतोय.

प्रिया वारियर, रोशन अब्दुल्ला रऊफ

एका रात्रीत स्टार झालेली मल्याळम अभिनेत्री प्रिया प्रकाश वारियर काही सेकंदांच्या तिच्या व्हिडिओने देशभरात प्रसिद्ध झाली. व्हॅलेंटाइन्स वीकच्या निमित्ताने व्हायरल झालेल्या व्हिडिओ क्लिपमधील तिच्या हावभावांचे लाखो तरुण दिवाने झाले आहेत. या व्हायरल व्हिडिओमुळे तिला एका दिवसात सर्वात जास्त इन्स्टाग्रामवर फॉलो केले गेले. आता अशाच एका व्हिडिओसाठी प्रिया आणि तिचा सहकलाकार रोशन अब्दुल रऊफ एकत्र आले आहेत. पुन्हा एकदा या नव्या व्हिडिओतील प्रियाच्या हावभावांनी तरुणांना घायाळ केले आहे.

इन्स्टाग्रामवरील प्रियाच्या एका फॅन पेजवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. यामध्ये रोशनसोबत सेल्फी व्हिडिओ काढताना प्रिया आणि रोशन हावभाव करताना पाहायला मिळत आहेत. यात पुन्हा एकदा प्रियाचा गमतीशीर अंदाज पाहायला मिळाला.

वाचा : ‘पावसाचा निबंध’च्या नावानं चांगभलं- नागराज मंजुळे 

प्रियाच्या आगामी चित्रपटाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर एकाच दिवसात प्रियाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटला ६ लाखांहून अधिक लोकांनी फॉलो केले. इन्स्टाग्रामवर एका दिवसात एवढे फॉलोअर्स मिळवणारी प्रिया जगभरातील तिसरी सेलिब्रिटी ठरली. त्यानंतर प्रियाने तिच्या अकाऊंटवरून मोठमोठ्या ब्रॅँडचे प्रमोशनसुद्धा सुरु केले. प्रमोशनच्या एका पोस्टसाठी ती जवळपास आठ लाख रुपये घेत असल्याचं म्हटलं जातं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 13, 2018 7:33 pm

Web Title: malayalam actress priya prakash varrier new video viral on social media
Next Stories
1 वाइल्डलाइफ क्राइम कंट्रोल ब्युरोच्या यादीत सलमान खान ३९ व्या क्रमांकावर
2 65th national film awards : ‘न्यूटन’ला मिळालेलं यश छत्तीसगढमधल्या जनसामान्यांचं- अमित मसुरकर
3 …जेव्हा बॉलिवूडचा खिलाडी साताऱ्याच्या उदयनराजे भोसलेंना भेटतो
Just Now!
X