24 January 2019

News Flash

प्रिया वरियरचा अजून एक व्हिडिओ व्हायरल

रणबीरचे गाणे गाण्यात प्रिया मग्न

प्रिया प्रकाश वरियर

व्हॅलेंटाइन्स डेच्या आधी सर्वत्र प्रेमाचेच वारे वाहत असून, सध्या या प्रेमाला दाक्षिणात्य टच मिळाला आहे असं म्हणावं लागेल. प्रेम ही एक अशी भावना आहे, जेथे भाषा, प्रांत या सर्व गोष्टी अगदी नगण्य होतात. अचानक प्रेमाची व्याख्या पुन्हा नव्याने आठवण्याचे कारण ठरतेय, अभिनेत्री प्रिया प्रकाश वरियर. सोशल मीडियावर हे नाव सध्याच्या घडीला अनेकांच्या सर्चलिस्टमध्ये अग्रस्थानी असून, तिच्या फोटोंचा संग्रहच जणू फेसबुक, ट्विटर आणि इन्स्टाग्रामवर पाहायला मिळतोय.

प्रिया आगामी ‘उरू अदार लव्ह’ या सिनेमातील ‘मनिक्य मलरया पूवी’ (Manikya Malaraya Poovi) या गाण्यामुळे अनेकांच्या हृदयाचा ठोका चुकवून गेली आहे. मग नक्की प्रिया वरियर आहे तरी कोण याचा शोध सुरू झाला. ती कोण आहे, तिची आवड निवड काय आहे हे शोधण्यामध्येच सोशल मीडिया व्यग्र झालं. या सगळ्या शोधात तिचा य अजून एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

या व्हिडिओमध्ये ती रणबीर कपूरच्या ऐ दिल है मुश्किल सिनेमातील चन्ना मेरेया हे गाणं गाताना दिसत आहे. तिचा हा व्हिडिओही ‘मनिक्य मलरया पूवी’ गाण्याच्या व्हिडिओसारखा तुफान व्हायरल झाला आहे. प्रिया केरळमधील त्रिशूर येथे राहते. गाण्यासोबतच तिला नृत्याची आणि फिरण्याची आवड आहे. सध्या ती वाणिज्य शाखेच्या पहिल्या वर्षाला आहे. प्रियाचा हा पहिलाच सिनेमा आहे. या सिनेमात तिने एका शाळकरी मुलीची व्यक्तिरेखा साकारली आहे. एका रात्रीत स्टार होणं काय असतं हे आज प्रिया अनुभवत असेल यात काही शंका नाही. या व्हिडिओचे अनेक मिम्सही तयार झाले आहेत.

First Published on February 13, 2018 2:09 pm

Web Title: malayalam actress priya prakash warrier singing channa mereya will melt your heart