News Flash

केरळ उच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही ‘इफ्फी’त ‘एस दुर्गा’ला प्रवेश नाहीच

'इफ्फी'च्या परीक्षकांनी सेन्सॉर बोर्डाला लिहिलं पत्र

'एस दुर्गा'

केरळ उच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही ४८व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ‘एस दुर्गा’ हा मल्याळम चित्रपट दाखवण्यात येणार नाही. इफ्फीच्या परीक्षकांनी चित्रपटाच्या नावावर आक्षेप घेत सेन्सॉर बोर्डाकडे तक्रार केली आहे. या चित्रपटाचे ‘सेक्सी दुर्गा’ हे नाव बदलून ‘एस दुर्गा’ असे ठेवण्यात आले होते. मात्र इफ्फीकडे पाठवताना ‘एस### दुर्गा’ असे नाव करण्यात आले. यावरच इफ्फीच्या परीक्षकांनी आक्षेप घेतला आहे.

‘इफ्फी’चा आज अखेरचा दिवस होता आणि एस दुर्गा महोत्सवात आज प्रदर्शित करण्यात येणार होता. मात्र नावातील बदलामुळे हा चित्रपट वगळण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. सनल कुमार ससिधरन दिग्दर्शित या चित्रपटाला आधी इफ्फीतून वगळण्यात आले होते. परीक्षकांना कोणतीही पूर्वसूचना न देता केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाकडून हा निर्णय घेण्यात आला होता. महोत्सवात या चित्रपटाचे चित्रीकरण केल्यास लोकांच्या भावना दुखावल्या जाऊ शकतात असे कारण मंत्रालयाकडून देण्यात आले होते. यामुळे माहिती व प्रसारण मंत्रालयावर जोरदार टीकाही करण्यात आली होती.

वाचा : महिलांसाठी आपल्या समाजात मैत्रीपूर्ण वातावरण नाही; ‘पद्मावती’ वादावर मिस वर्ल्ड मानुषीची प्रतिक्रिया 

दिग्दर्शक ससिधरन यांनी केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालय आणि आणि इफ्फीविरोधात १५ नोव्हेंबरला केरळ उच्च न्यायालयाकडे धाव घेतली होती. यावर सेन्सॉर बोर्डाने प्रमाणपत्र दिल्याने इफ्फीमध्ये ‘एस दुर्गा’ दाखवला जाऊ शकतो, असे न्यायालयाने सांगितले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 28, 2017 6:49 pm

Web Title: malayalam film s durga not to be screened at iffi 2017 goa
Next Stories
1 अक्षय कुमारच्या मुलीसोबत दिसले हे स्टार किड्स
2 बॉबी देओलने जिंकली नव्या लूकची ‘रेस’
3 प्रभासचा ‘साहो’ या कारणासाठी असेल खास
Just Now!
X