News Flash

ट्विंकलच्या माफीनाम्यावरही मल्लिकाची खोचक शब्दांत टीका

हा वाद कधी संपणार?

मल्लिका दुआ, ट्विंकल खन्ना

‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज’ या कार्यक्रमातून सुरू झालेला अक्षय कुमार आणि मल्लिका दुआ यांच्यातील वाद काही संपता संपेना. ‘मल्लिका जी आप बेल बजाईये, मै आपको बजाता हूं’, असं अक्षय या कार्यक्रमात म्हणाला होता. हेच वक्तव्य त्याला चांगलंच अडचणीत आणणारं ठरलं आहे. यावरून मल्लिकाच्या वडिलांनी म्हणजेच ज्येष्ठ पत्रकार विनोद दुआ यांनी थेट शब्दांत नाराजी व्यक्त केली होती. या संपूर्ण वादात खिलाडी कुमारची पत्नी ट्विंकल खन्नानेही उडी घेतली. मात्र, यामुळे ट्विंकललाही टीकांना सामोरं जावं लागलं. अखेर ट्विंकलने फेसबुक पोस्टच्या माध्यमातून तिच्या कमेंटविषयी माफी मागितली. तिच्या माफीनंतरही हा वाद संपला नाही. त्यावर आता मल्लिकाने पुन्हा एकदा ट्विंकलला सडेतोड उत्तर दिलं आहे.

विनोद चुकीच्या पद्धतीने मांडू नका असं म्हणत ट्विंकलने अक्षयची पाठराखण केली होती. त्याने हे वक्तव्य कोणाला दुखावण्यासाठी किंवा इतर कोणत्याही हेतूने केलं नसल्याचं तिने ट्विटमध्ये स्पष्ट केलं. मात्र, तिच्या या भुमिकेमुळे अनेकांनी नाराजीचा सूर आळवल्यानंतर सरतेशेवटी ट्विंकलने मल्लिकाचं नाव न घेता फेसबुक पोस्टच्या माध्यमातून माफी मागितली.

Next Stories
1 अमृता प्रीतम यांच्या भुमिकेत दिसणार दीपिका पदुकोण?
2 PHOTOS : भारती सिंगचा वेडिंग गाऊन पाहिलात का?
3 माहिरा खानने जाणूनबुजून मोडले विमानातील नियम
Just Now!
X