News Flash

भाडे न दिल्याने बॉयफ्रेंडसह मल्लिकाला घरमालकाने काढले बाहेर

गेल्या वर्षी नोव्हेंबरपासून त्यांनी घरभाडे देणे बंद केले

मल्लिका शेरावत

बॉलिवूड अभिनेत्री मल्लिका शेरावतचे खासगी आयुष्य सध्या अडचणीत सापडली आहे आहे. असे म्हटले जाते की, मल्लिका आणि तिच्या फ्रेंच प्रियकराला घरभाडे न दिल्यामुळे घरातून हाकलवण्यात आले आहे. बीबीसीच्या रिपोर्ट्सनुसार, मल्लिका आणि तिचा प्रियकर सिरिल ऑग्जनफॅन्स हे पॅरिसमधील एका अपार्टमेन्टमध्ये राहत होते. दोघांनी ८० हजार युरो म्हणजे साधारणपणे ६४ लाख रुपयांचे भाडे अजूनपर्यंत दिले नाही. मल्लिकाच्या वकिलाच्या म्हणण्यानुसार, गेल्या वर्षी नोव्हेंबरपासून त्यांनी घरभाडे देणे बंद केले. याचे मुख्य कारण म्हणजे  त्या याच महिन्यात त्यांच्यावर अज्ञातांनी हल्ला केला होता. या अज्ञात व्यक्तींनी घरात घुसून मल्लिकावर अश्रूधुराचा वापर करुन लुटमार केली होती. या प्रकरणाचा राग म्हणून त्यांनी भाडे दिले नाही. या प्रकरणाचा योग्य तो शोध लागल्यावर ते संपूर्ण घरभाडे देतील असे आश्वासनही त्यांनी दिले आहे.

मल्लिका पॅरिसमध्ये 16th arrondissement परिसरात राहते. उच्चभ्रू लोकांचा परिसर म्हणून याकडे पाहिले जाते. मल्लिकाने प्रियकराशी लग्न केल्याची चर्चा होती. मात्र, मल्लिकाने मध्यंतरी हे वृत्त फेटाळून लावले होते . अशा अफवा पसरवणं बंद करा. जेव्हा मी लग्न करेन तेव्हा मी सगळ्यांनाच आमंत्रण देईन, असे मल्लिकाने सांगितले. पण तिच्या वडिलांनी एका मुलाखतीत मल्लिकाने लग्न केल्याचे सांगितले होते.

मल्लिकाने सिनेसृष्टीत पदार्पण करण्यापूर्वी पंजाबमधील कॅप्टन कर्ण गिलशी १९९७ मध्ये विवाह केला होता. पण त्या दोघांचा संसार फार काळ टिकू शकला नाही. २००१ मध्ये दोघांनी घटस्फोट घेतला. त्यानंतर आजपर्यंत मल्लिका सिंगल आहे. पण गेल्या अनेक दिवसांपासून ती सिरिल ऑग्जनफॅन्सला डेट करत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 15, 2017 9:53 am

Web Title: mallika sherawat and french boyfriend eviction from his paris apartment not paying rent
Next Stories
1 फ्लॅशबॅक : प्रेम नाम है मेरा…!
2 मधुकर वृत्तीने तबलावादन शिकलो
3 माझ्या वडिलांची ही मिराशी
Just Now!
X