23 April 2019

News Flash

‘हा’ फोटो शेअर करत मल्लिकाने जागवल्या शाळेच्या आठवणी

चाहत्यांना भेटण्यासाठी मल्लिकाने पुन्हा एक फोटो शेअर केला आहे.

मल्लिका शेरावत

बॉलिवूड चित्रपटांतील बोल्ड भूमिकांसाठी ओळखली जाणारी अभिनेत्री मल्लिका शेरावतने सध्या बॉलिवूडपासून फारकत घेतली आहे. मात्र अनेक वेळा सोशल मीडियाच्या माध्यमातून ती चाहत्यांच्या भेटीला येत असते. त्यामुळे चाहत्यांना भेटण्यासाठी मल्लिकाने पुन्हा एक फोटो शेअर केला असून या फोटोमध्ये मल्लिकाला ओळखं अशक्य होत आहे.

बोल्ड आणि बिंधास्त अंदाजासाठी ओळखली जाणाऱ्या मल्लिकाने सध्या तिच्या शालेय जीवनातील एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये तिने साडी नेसली असून ही मल्लिकाच आहे यावर कोणाचाही विश्वास बसणार नाही. विशेष म्हणजे यामध्ये ती अत्यंत साधी आणि गोड दिसत आहे.

साडीतला हा फोटो सध्या चर्चेचा विषय ठरत असून तो वाऱ्यासारखा व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये तिच्याबरोबर तिच्या शाळेतील काही मैत्रीणीही दिसून येत आहे. हा फोटो शाळेतील शिक्षक दिनानिमित्त काढण्यात आला आहे.

First Published on August 10, 2018 1:45 pm

Web Title: mallika sherawat goes back to school