22 January 2021

News Flash

…अन् त्यांना पाहून मल्लिका शेरावत पळू लागली; व्हिडीओ होतेय व्हायरल

पळणाऱ्या मल्लिकाला पाहून सर्वच जण चकित झाले.

करोना विषाणूच्या वाढत्या संक्रमणामुळे देशभरात लॉकडाउन जारी करण्यात आला. लॉकडाउनचे सध्या पाचवे पर्व सुरु आहे. परिणामी घरात राहून वैतागलेल्या लोकांसाठी सरकारने काही नियमांना हळूहळू क्षितील करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे शहरांमधील अनेक लोक आता फेरफटका मारण्यासाठी घराबाहेर पडताना दिसत आहेत. दरम्यान अभिनेत्री मल्लिका शेरावत देखील जॉगिंग करण्यासाठी घराबाहेर पडली होती. तेवढ्यात तिने फोटोग्राफर्सला पाहिलं आणि धुम ठोकली. फोटोग्राफर्सची नजर चुकवून पळणाऱ्या मल्लिकाचा गंमतीशीर व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.

मल्लिकाचा हा व्हिडीओ इन्स्टाग्राम अकाउंटवरुन शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये मल्लिका जॉगिंग करताना दिसतेय. करोनापासून वाचण्यासाठी तिने आपल्या तोंडावर मास्क लावला आहे. मास्कमुळे मल्लिका चटकन ओळखू येत नाही आहे. परंतु तेथे उपस्थित असलेल्या फोटोग्राफर्सनी मात्र तिला अचूक ओळखले. ते फोटो काढण्यासाठी तिच्या मागे पळू लागले. त्यांना पाहून मल्लिका देखील पळू लागली. हा पकडापकडीचा गंमतीशीर खेळ या व्हिडीओमध्ये पाहायला मिळतोय.

अभिनेत्री मल्लिका शेरावत वादग्रस्त विधानं व मादक फोटोंमुळे सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. यावेळी ती या व्हि़डीओमुळे चर्चेत आहे. तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. काही तासांत शेकडो नेटकऱ्यांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 10, 2020 2:49 pm

Web Title: mallika sherawat grabbed by fans mppg 94
Next Stories
1 Video : ‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका करणं सोपं; पण…’
2 लॉकडाउनमुळे घरीच सेलिब्रेट केलं नताशाचं बेबीशॉवर; पाहा फोटो
3 मुंबईतील डबेवाल्यांसाठी संजय दत्त आला धावून; उद्धव ठाकरेंना केली विनंती
Just Now!
X