अमेरिकेमध्ये नुकत्याच पार पडलेल्या अध्यक्षीय निवडणुकीत डेमॉक्रटिक पक्षाचे उमेदवार जो बायडेन यांनी डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव केला. त्याचबरोबर उपराष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत भारतीय वंशाच्या कमला हॅरिस यांनीही दणदणीत विजय संपादित केला. हॅरिस यांच्या विजयानंतर अभिनेत्री मल्लिका शेरावतने ११ वर्षांपूर्वी केलेलं एक ट्विट प्रचंड व्हायरल होत आहे. मल्लिकानं केलेली भविष्यवाणी खरी ठरल्याचंही काही जण म्हणत आहेत.

अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत भारतीय वंशाच्या कमला हॅरिस विजयी झाल्यानंतर भारतातही आनंद व्यक्त होत आहे. कमला हॅरिस दीर्घ काळापासून राजकारणात सक्रिय आहेत. त्यांना डेमॉक्रटिक पक्षाच्या मोठ्या नेत्या मानलं जातं. त्यामुळेच त्यांना उपराष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उमेदवारी देण्यात आली होती.

आणखी वाचा- We did it Joe! विजयानंतर कमला हॅरिस यांच्या डोळ्यात आनंदाश्रू!

कमला हॅरिस निवडून आल्यानंतर अभिनेत्री मल्लिका शेरावतचं एक ट्विट प्रचंड व्हायरल होतं आहे. कमला हॅरिस यांच्या राजकीय कारकीर्दीविषयी मल्लिका शेरावतने ११ वर्षांपूर्वी एक भविष्यवाणी केली होती. मल्लिकाने केलेली भविष्यवाणी खरी ठरल्याचं बोललं जात आहेत.

मल्लिका शेरावतनं २००९मध्ये हे ट्विट केलं होतं. ज्यात मल्लिकाने आशा व्यक्त केली होती की, कमला हॅरिस या एक दिवस अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षा होतील, असं मल्लिकानं म्हटलेलं होतं. “एका पार्टीमध्ये जिथे धमाल करत आहे, तिथे एक महिला बसलेली आहे, ज्यांच्याविषयी म्हटलं जात आहे की त्या अमेरिकेच्या राष्ट्रपती बनू शकतात,” असं मल्लिकाने या ट्विटमध्ये होतं.

आणखी वाचा- इतिहास घडवणाऱ्या अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांचं व्यक्तिमत्व जाणून घ्या

मल्लिकानं आपल्या ट्विटमध्ये कमला हॅरिस राष्ट्राध्यक्ष होऊ शकतात असं म्हटलेलं होतं. मात्र काही अंशी तिचं भाकित खरं ठरलं आहे. ११ वर्षानंतर कमला हॅरिस उपराष्ट्राध्यक्ष बनल्या आहेत.