02 March 2021

News Flash

मल्लिकाने दाखवली ‘कान्स’च्या रेड कार्पेटवरील लूकची झलक

कान्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव २०१९ यंदा १४ मे २०१९ पासून फ्रान्समध्ये सुरु झाले आहे

‘कान्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव २०१९’ यंदा १४ मे २०१९ पासून फ्रान्समध्ये सुरु झाला आहे. या महोत्सवाला अनेक बॉलिवूड कलाकरांनी हजेरी लावली आहे. त्यातील टीव्ही मालिका, ‘कसौटी जिंदगी की २’मधील अभिनेत्री हिना खानने तिचा जलवा कान्स महोत्सवात दाखवला आहे. तिचा हा सुंदर ड्रेस झियाद नकद कोतूरने डिझाईन केला आहे.

या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात अभिनेत्री मल्लिका शेरावत देखील सहभागी होणार आहे. नुकताच तिने या महोत्सवासाठी घेतलेल्या ड्रेसचा लुक सोशल मीडियावर शेअर केला आहे. फोटो पोस्ट करताना ‘कान्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची तयारी सुरू.’ असे तिने लिहिले होते. या आकाशी रंगाच्या गाऊनमध्ये मल्लिका अत्यंत सुंदर आणि ग्लॅमरस दिसत आहे. तिचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

अभिनेत्री प्रियांका चोप्रा, दीपिका पदूकोण, सोनम कपूर, कंगना रणौत आणि हिमा कुरेशी या अभिनेत्री देखील कान्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव २०१९मध्ये सहभागी होणार आहेत. परंतु या अभिनेत्री काय परिधान करणार याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. हिना खान आणि मल्लिका शेरावत नंतर इतर बॉलिवूड अभिनेत्रींचा रेड कार्पेटवरील अंदाज पाहण्यासाठी चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

कान्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे यंदाचे ७२वे वर्ष आहे. हा महोत्सव १४ मे रोजी सुरु होणार असून २५ मे रोजी संपणार आहे. या महोत्सवात देशभरातून अनेक कलाकार रेड कार्पेटवर स्वत:ला एकदम हटके अंदाजात सादर करत असतात.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 16, 2019 6:44 pm

Web Title: mallika sherawat is going to wear at the cannes 2019
Next Stories
1 मी अनेकदा आयुषमानला सोडण्याचा विचार केला- ताहिरा कश्यप
2 बिग बी म्हणतात, ‘या दोन गोष्टींची किंमत मोजावीच लागते’
3 ‘गेम ऑफ थ्रोन्स पुन्हा शूट करा’; दोन लाख चाहत्यांची HBOकडे तक्रार
Just Now!
X