21 October 2019

News Flash

…म्हणून आई होण्याची मल्लिकाला वाटतेय भीती

एका मुलाखती दरम्यान मल्लिकाने याचा खुलासा केला आहे

बॉलिवूड अभिनेत्री मल्लिका शेरावत नेहमी बोल्ड भूमिका आणि हॉट लूकमुळे चर्चेत असते. आपल्या व्यग्र वेळापत्रकामधून वेळ काढून मल्लिका लहान मुलांनसोबत वेळ घालवत असल्याचे पाहायला मिळते. त्यामुळे एका मुलाखती दरम्यान तिला आई व्हायला आवडेल का? असे अनेक प्रश्न विचारण्यात आले होते. त्यावर तिने दिलेल्या उत्तरामुळे सध्या ती चर्चेचा विषय बनली आहे.

मल्लिका तिच्या व्यग्र वेळापत्रकामधून वेळ काढून भाऊ विक्रम लाम्बाचा मुलगा रणशेरसोबत वेळ घालवताना दिसते. म्हणून एका मुलाखतीमध्ये मल्लिकाला आई होण्याबाबत प्रश्न विचारण्यात आले होते. त्यावर मल्लिकाने आई होण्यासाठी तयार नसल्याचे सांगितले. दरम्यान मल्लिकाने त्यामागील कारणही सांगितले आहे. ‘आई होणे ही खूप मोठी जवाबदारी आहे आणि त्यासाठी आता मी तयार नाही. मुलांची जवाबदारी घेण्याची मला भीती वाटते. आता मी कधी ही कुठे ही बॅग उचलून फिरायला जायला निघते’ असे मल्लिका म्हणते.

‘जर तुम्ही एक आई असाल तर तुम्हाला मुलांचा विचार पहिले करावा लागतो आणि या विचारानेच मी घाबरते. मी आता जशी आहे तशी खूश आहे’ असे मल्लिकाने सांगितले.

आणखी वाचा : प्रदर्शनापू्र्वीच रानू मंडल यांच्या दुसऱ्या गाण्याचा सोशल मिडियावर धुमाकूळ

दरम्यान मल्लिकाने पुतण्या रणशेरसोबत असलेल्या नात्याबद्दल ही वक्तव्य केले आहे. ‘रणशेर माझ्या मुलासारखाच आहेच. मी आता पर्यंत त्याच्यासोबत खूप चांगला वेळ घालवला आहे. मी त्याच्यासोबत खेळते, त्याला घेऊन फिरायला जाते. त्याच्या सोबत घालवलेला वेळ माझ्या आयुष्यातील सर्वात महत्वाचा आणि अविस्मरणीय वेळ आहे. त्याची नॅपी बदलणे किंवा आणखी कोणतेच कर्तव्य माझ्याकडे नाही’ असे मल्लिका पुढे म्हणाली.

काही दिवसांपूर्वी मल्लिका फ्रेंच व्यवसायिक सिरिल ऑझेफाला डेट करत असल्याच्या चर्चा होत्या. पण एका मुलाखतीमध्ये मल्लिकाने ती सिंगल असल्याचा खुलासा केला.

First Published on September 18, 2019 4:08 pm

Web Title: mallika sherawat is not ready to take responsibility of baby avb 95