News Flash

“तुझ्या चित्रपटांमुळे महिलांवरील अत्याचार वाढतोय” म्हणणाऱ्याला मल्लिका शेरावतने सुनावले

हाथरस प्रकरणावर मल्लिकाने ट्विट केलं होतं.

मल्लिका शेरावत

महिलांवरील वाढत्या अत्याचाराचं खापर चित्रपटांवर फोडणाऱ्या नेटकऱ्याला अभिनेत्री मल्लिका शेरावत सुनावले. हीच मानसिकता बदलण्याची गरज असल्याचं मत मल्लिकाने मांडलं. हाथरस बलात्कार प्रकरणावर मल्लिकाने एक ट्विट केलं होतं. त्याच ट्विटवर रिप्लाय देत एका नेटकऱ्याने मल्लिकाच्या चित्रपटांना दोष दिला.

‘भारतात महिलांविषयी असलेली मानसिकता जोपर्यंत बदलत नाही, तोपर्यंत काहीच बदलणार नाही’, असं ट्विट मल्लिकाने केलं होतं. तिच्या या ट्विटला उत्तर देत एकाने लिहिलं, ‘पण बॉलिवूडमध्ये तू ज्या प्रकारच्या भूमिका साकारल्या आहेत, त्याच्या विरोधात हे तुझं वक्तव्य आहे. तुझ्या चित्रपटांमधून तू जो संदेश पोहोचवतेस तो सुद्धा अशा घटनांसाठी कारणीभूत असतो असं नाही वाटत का तुला? दुसऱ्यांना उपदेश देण्याआधी स्वत:ला सुधारावं.’

संबंधित ट्विटर युजरला सुनावत मल्लिकाने पुढे लिहिलं, ‘म्हणजे ज्या चित्रपटांमध्ये मी काम करते, ते बलात्काराचं आमंत्रण देतात. ही तुमच्यासारखी मानसिकताच भारतीय समाजाला महिलांविरोधी बनवतेय. जर तुम्हाला माझ्या चित्रपटांची समस्या असेल तर ते पाहू नका.’

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 8, 2020 1:04 pm

Web Title: mallika sherawat slams twitter user who blamed her films for violence against women ssv 92
Next Stories
1 Spoiler Alert: बिग बॉसमध्ये आज राहुल वैद्य आणि पवित्रामध्ये होणार जोरदार भांडण
2 “माझ्या मनात अनेकदा आत्महत्येचा विचार आला, पण..”; रिया चक्रवर्तीच्या आईने मांडली व्यथा
3 ‘मदत करतो,पण त्या बदल्यात…’; रिक्षाचालकाचा मदत करणाऱ्या सोनू सूदने मागितला मोबदला
Just Now!
X