27 February 2021

News Flash

‘द स्टोरी’मध्ये मल्लिका झळकणार अशा अंदाजात!

मल्लिका लवकरच एका वेबसीरिजमध्ये झळकणार आहे.

बी टाऊनमध्ये बोल्ड अंदाजासाठी ओळखली जाणारी अभिनेत्री मल्लिका शेरावत गेला काही काळा पडद्यापासून दूर झाली होती. मात्र ती सोशल मीडियाच्या माध्यमातून सक्रिय असलेली मल्लिका आता चंदेरी दुनियेमध्ये पुन्हा एकदा पदार्पण करण्यास सज्ज झाल्याचं पाहायला मिळत आहे. मल्लिका लवकरच एका वेबसीरिजमध्ये झळकणार असून या वेबसीरिजचा पहिला प्रोमो नुकताच प्रदर्शित झाला आहे.
‘द स्टोरी’ या वेबसीरिजमध्ये मल्लिका नव्या अंदाजात झळकणार असून ही सीरिज सस्पेंस आणि थ्रिलरने परिपूर्ण असल्याचं सांगण्यात येत आहे.

‘द स्टोरी’चा नवा प्रोमो प्रदर्शित होण्यापूर्वी या सीरिजचे दोन भाग प्रसारित झाले होते. या दोन्ही भागांमध्ये अभिनेत्री स्वरा भास्कर आणि सुमित व्यास झळकले आहेत. विशेष म्हणजे या दोन्ही भागांना प्रेक्षकांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिल्याचं पाहायला मिळालं आहे.

दरम्यान, प्रदर्शित झालेल्या प्रोमोमध्ये क्राईम आणि थ्रिलरचा समावेश करण्यात आला असून ही सीरिज झी ५ वर प्रदर्शित होणार आहे. तसेच या सीरिज व्यक्तिरिक्त मल्लिका ‘द गुड वाईफ’ मध्ये झळकणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 29, 2018 7:39 pm

Web Title: mallika sherawat upcoming web series the story promo has been released
Next Stories
1 TOP 10: दिशा पटानीच्या व्हायरल व्हिडिओपासून दिया मिर्झाने खरेदी केलेल्या पोस्टरपर्यंत,सर्व काही एका क्लिकवर
2 स्वरा भास्कर चा ‘इट्स नॉट दॅट सिंपल – २ ‘ चा फर्स्ट लूक रिलीज
3 ‘या’ खास ठिकाणी सुशांतने खरेदी केली आहे जमीन!
Just Now!
X