24 November 2020

News Flash

अभिनेत्री मालवी मल्होत्रावर प्राणघातक हल्ला

मित्रानेच केला मालवीवर हल्ला

अभिनेत्री मालवी मल्होत्रा हिच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. मुंबईतील कोकिलाबेन धीरुभाई अंबानी रुग्णालयात सध्या तिच्यावर उपचार सुरु आहेत. लग्न करण्यास नकार दिल्याने संबंधित आरोपीने हल्ला केल्याची माहिती समोर येत आहे. ‘झी न्यूज इंडिया’ने दिलेल्या वृत्तानुसार, आरोपी योगेश महिपाल सिंग याने आधी मालवीची दोन-तीन वेळा भेट घेतली होती. निर्माता असल्याचं सांगत त्याने मालवीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर लग्नाची मागणी घातली. मालवीने लग्न करण्यास नकार दिल्याने योगेशने तिच्यावर चाकूने हल्ला केला. सोमवारी रात्री नऊ वाजताच्या सुमारास वर्सोवा परिसरात मालवीवर हल्ला करण्यात आला. कॅफेमधून घरी परतत असताना तिच्यावर योगेशने हल्ला केला.

‘एबीपी न्युज’नुसार, झालेल्या हल्ल्यात मालवीच्या शरीरावर चाकूने तीन वार करण्यात आले आहेत. याप्रकरणानंतर मालवीने मुंबईतील वर्सोवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. सध्या मालवीची प्रकृती स्थिर असून रुग्णालयात देखरेखीखाली आहे.

 

View this post on Instagram

 

Colours makes me smile#candid #beyou #malvimalhotra

A post shared by Malvi Malhotra (@malvimalhotra) on

दरम्यान, मालवीने छोट्या पडद्यावरील अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. तसंच तिने तेलुगू, मल्याळम चित्रपटांमध्येदेखील काम केलं आहे. अलिकडेच तिची उडान ही मालिका विशेष गाजली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 27, 2020 1:05 pm

Web Title: malvi malhotra serious attack by goons actress admitted to dhirubhai ambani hospital ssj 93
Next Stories
1 ‘ती माझ्या मांडीवर बसली होती’; अभिनेत्याच्या कॉमेंटवर शेफाली संतापली, म्हणाली…
2 वैमानिक ते अभिनेता.. प्रणव पिंपळकरचा अभूतपूर्व प्रवास
3 स्पर्धकाला ८० हजार रुपयांच्या ‘या’ प्रश्नाचे देता आले नाही उत्तर, तुम्ही देऊ शकाल का?
Just Now!
X