News Flash

त्या रात्री नेमकं काय घडलं? हल्ल्यानंतर अभिनेत्री मालवीने केला धक्कादायक खुलासा

"त्याला माझा चेहरा बिघडवायचा होता, पण..."

अभिनेत्री मालवी मल्होत्रावर वर्सोवा परिसरात एका व्यक्तीने चाकूने प्राणघातक हल्ला केला. मालवीवर सध्या मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आरोपी योगेश महिपाल सिंहला माझ्या चेहऱ्यावर हल्ला करायचा होता, असा खुलासा तिने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत केला.

‘ई टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत मालवीने सांगितलं, “कॅफेमधून मी घरी परतत असताना त्याने मला रस्त्यातच गाठलं. त्याने चाकूने माझ्या पोटावर वार केला आणि नंतर त्याला माझा चेहरा बिघडवायचा होता. मी माझ्या हातांनी चेहरा झाकायचा प्रयत्न केला तेव्हा त्याने माझ्या उजव्या हातावर चाकूने वार केला.”

जानेवारी महिन्यात कामानिमित्त योगेशला दोन-तीन वेळा भेटल्याची कबुली मालवीने या मुलाखतीत दिली. त्यानंतर एका तामिळ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान उटीमध्ये दोघांची पुन्हा भेट झाली. त्यानंतर त्याला भेटण्याचं टाळत असल्याचं तिने स्पष्ट केलं. “तिसऱ्या भेटीदरम्यान त्याने मला प्रपोज केलं आणि लग्नाची मागणी घातली. मी फार नम्रतेने त्याला सांगितलं की हे शक्य नाही आणि त्यानंतर त्याला भेटण्याचं टाळत होते. मात्र त्यानंतर त्याने मला फुलं पाठवण्यास सुरुवात केली. कधी अचानक माझ्या बिल्डिंगखाली येऊन उभा राहायचा आणि तासनतास थांबायचा”, असं तिने सांगितलं.

लग्नास नकार दिल्याने योगेशने तिच्यावर चाकूने तीन वेळा हल्ला केल्याचा खुलासा मालवीने केला. याप्रकरणी वर्सोवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 29, 2020 10:46 am

Web Title: malvi malhotra stabbed by stalker says she has undergone plastic surgery ssv 92
Next Stories
1 ‘फॅशन’मधील कंगना-प्रियांकाच्या भूमिका ‘या’ मॉडेल्सच्या आयुष्यावर आधारित
2 राहुल वैद्य म्हणजे ‘बिग बॉस १४’ मधील कचरा; करण पटेलची टीका
3 ‘तेरी चोरिया’मध्ये नुशरत-राजकुमार रावचा रोमँण्टिक अंदाज, पाहा व्हिडीओ
Just Now!
X