09 March 2021

News Flash

‘शाहरुख प्रमाणे बुर्ज खलिफावर वाढदिवस साजरा करायची इच्छा’, सोनू सूदचे नेटकऱ्याला भन्नाट उत्तर

सोनू सूदने दिलेल्या उत्तराची सोशल मीडियावर चर्चा

लॉकडाऊनच्या काळात अनेक प्रवासी मजुरांसाठी देवदूत ठरलेला अभिनेता सोनू सूद आजही वेगवेळ्या कारणांनी चर्चेत आहे. सोनू सुदकडून होत असलेले मदत कार्य अजूनही सुरूच आहे. तो सोशल मीडियाद्वारे अनेकांची मदत करताना दिसतो. नुकताच एका नेटकऱ्याने सोनू सूदकडे आगळीवेगळी मागणी केली आहे आणि सोनू सूदने देखील त्याला भन्नाट उत्तर दिले आहे.

या नेटकऱ्याने त्याचा वाढदिवस बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानसारखा साजरा करण्याची इच्छा सोनू सूदकडे व्यक्त केली आहे. ‘सोनू सर, ५ नोव्हेंबर रोजी माझा वाढदिवस आहे. बुर्ज खलिफावर मला वाढदिवस साजरा करायचा आहे. कृपया माझी इच्छा पूर्ण करा’ असे एका यूजरने म्हटले होते.

त्यावर सोनू सूदने उत्तर देत, ‘भाऊ तुझा वाढदिवस फक्त तिन दिवस उशीरा आला. थोडी मेहनत कर आणि चांगले नाव कमाव. नंतर बघ बुर्ज खलिफा काय आकाशावर देखील तुझे नाव लिहितील’ असे म्हटले.

तीन नोव्हेंबर रोजी बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा वाढदिवस साजरा करण्यात आला. वाढदिवसाच्या निमित्ताने जगभरातून त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला गेला. अगदी वृत्तवाहिन्यांपासून सोशल मीडियापर्यंत सर्व ठिकाणी शाहरुखचीच चर्चा होती. दरम्यान शाहरुखचा वाढदिवस दुबईमध्ये देखील मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला. जगातल्या सर्वात उंच इमारतीवर शाहरुखसाठी विशेष रोषणाई करण्यात आली असून याचा एक फोटो शाहरुखने शेअर केला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 4, 2020 3:08 pm

Web Title: man appeal to sonu sood for his birthday celebration like shahrukh khan avb 95
Next Stories
1 Video : बम भोले! अंगावर काटा आणणारं ‘लक्ष्मी’मधील गाणं प्रदर्शित
2 Big Boss 14: निक्कीने धुतली अभिनेत्याची अंतर्वस्त्रं; माजी स्पर्धक संतापले
3 …म्हणून आदित्यने घेतला सोशल मीडियापासून ब्रेक
Just Now!
X