अभिनेत्री मृण्मयी देशपांडे हे नाव मराठी प्रेक्षक वर्गाला नवं नाही. मृण्मयी अनेक चित्रपट, मालिकांच्या माध्यमातून घराघरात पोहोचली आहे. लवकरच ती मनाचे श्लोक या चित्रपटाचून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सध्या या चित्रपटाचं चित्रीकरण सुरु झालं असून या व्यस्त कामकाजातून वेळ काढत मृण्मयीने तिचा मतदानाचा हक्क बजावला आहे. विशेष म्हणजे तिच्यासोबत चित्रपटाच्या टीममधील काही सदस्यांनीही मतदान केलं.

‘मनाचे श्लोक’ या चित्रपटाचं दिग्दर्शन खुद्द मृण्मयीने केलं असून गणराज असोसिएट्स आणि संजय दावरा फिल्म्स या चित्रपटाची निर्मिती करत आहेत. नुकतचं या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली असून ‘मनाचे श्लोक’ या चित्रपटाच्या टीमपैकी पुण्यातील सुजाण नागरिकांनी व्यस्त वेळापत्रकातून वेळातवेळ काढून आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. यात मृण्मयी देशपांडे, राहुल पेठे, निर्माता श्रेयश जाधव, संजय दावरा आदींचा समावेश होता. मतदान झाल्यावर या टीमने पुन्हा चित्रीकरणाला सुरुवात केली.

all the best marathi natak preview loksatta ravindra pathare
नाटयरंग : ‘ऑल दि बेस्ट’ – गजब ‘त्यांची’ अदा!
Marathi actor Ajinkya Deo play role in ranbir kapoor ramayan movie
अजिंक्य देव रणबीर कपूरच्या ‘या’ बहुचर्चित चित्रपटात झळकणार, व्यक्तिरेखेबाबत म्हणाले…
Mrunmayee Deshpande talks about her character in Swargandharva Sudhir Phadke Movie
इन्स्टाग्रामवरील ‘या’ रीलमुळे मृण्मयी देशपांडेला ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ चित्रपटात मिळाली भूमिका, म्हणाली, “माझ्याबाबतीत…”
crew movie review by loksatta reshma raikwar
Crew Movie Review : रंजक सफर

‘मनाचे श्लोक’ या चित्रपटाचा मुहूर्त सोहळा नुकताच पार पडला. या चित्रपटाच्या माध्यमातून मृण्मयी आणि राहुल पेठे पुन्हा एकदा एकत्र झळकणार असून चित्रपटाच्या निर्मितीची धुरा श्रेयश जाधव आणि संजय दावरा यांनी सांभाळली आहे. चित्रपटाचे डीओपी अभिजित अब्दे आहेत. ‘मनाचे श्लोक’ या सिनेमाचे चित्रीकरण पुण्यात सुरु झाले आहे. आज या चित्रपटातील कलाकारांनी मतदान करून इतर नागरिकांनाही आवर्जून आपला हा अधिकार बजावण्याचे आवाहन केले.