News Flash

‘तुम्ही मला बुधवार पेठेत कधी पाहिलं?’ ट्रोलरवर भडकली मानसी नाईक

ट्रोल करणाऱ्याला तिने सडेतोड उत्तर दिले आहे.

आपल्या अभिनय आणि नृत्य कौशल्याने अनेकांच्या मनावर जादू करणारी मराठमोळी अभिनेत्री म्हणजे मानसी नाईक. ती सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. काही दिवसांपूर्वी मानसीने लग्न केले. तिच्या लग्नातील फोटो सोशल मीडियावर चर्चेत होते. पण सध्या मानसी एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आहे. मानसीने लाइव्ह सेशनमध्ये ट्रोल करणाऱ्याला सडेसोड उत्तर दिले आहे.

मानसी ही सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ती सतत तिचे फोटो आणि व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करताना दिसते. काही दिवसांपूर्वी मानसीच्या एका फोटोवर यूजरने अपशब्द वापरत कमेंट केल्या होता. त्यानंतर आता एका लाइव्ह सेशनमध्ये मानसी ट्रोलिंगवर बोलली आहे. त्यावेळी ती म्हणाली काही दिवसांपूर्वी माझ्या एका फोटोवर यूजरने मी बुधवार पेठेतील आहे अशी कमेंट केली होती. ती कमेंट पाहून मला हसूही आलं आणि वाईट ही वाटलं.

आणखी वाचा : …त्यासाठी लग्न करण्याची आवश्यकता नाही- मयूरी देशमुख

 

View this post on Instagram

 

A post shared by mardmarathi (@mardmarathi99)

आणखी वाचा :‘लोकं उपाशी मरतायेत आणि…’, काजोलचा व्हिडीओ पाहून संतापले यूजर्स

पुढे मानसी त्या यूजरला उत्तर देत म्हणाली, ‘तुम्ही मला बुधवार पेठेत कधी पाहिलं? आणि म तुम्ही तेथे काय करत होतात? बुधवार पेठ ही जागा ज्या बायका चालवतात त्या बायका स्वत:चं पोट भरण्यासाठी काम करतात. प्रामाणिकपणे काम करतात.’ ‘पण दुसऱ्यांना आशा भाषेत शिव्या घालून तुम्हाला काय मिळतं?’ असा सवाल मानसीने त्या यूजरला केला आहे.

मानसीने १९ जानेवारी २०२१ रोजी बॉक्सर प्रदीप खरेराशी लग्न केले. नोव्हेंबर महिन्यात मानसीने तिचा प्रदीप खरेरा सोबत साखरपुडा झाल्याचे जाहीर केले होते. पण लग्नानंतर देखील मानसीला ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 28, 2021 12:25 pm

Web Title: manasi naik slam trollers avb 95
Next Stories
1 प्रियांकाने शेअर केला ‘सिटाडेल’च्या सेटवरून BTS फोटो
2 “प्रियांका चोप्राची बहीण असल्याने मला बॉलिवूडमध्ये काम मिळालं नाही”, मीरा चोप्राचा खुलासा
3 स्मिता पाटील… प्रतिक बब्बरने छातीवर काढला आईच्या नावाचा टॅट्यू
Just Now!
X