23 November 2020

News Flash

बोल्ड फोटो शेअर केल्यामुळे अभिनेत्री झाली ट्रोल, घेतला ‘हा’ निर्णय

व्हिडीओ शेअर करत दिली माहिती..

बॉलिवूड कलाकारांसाठी ट्रोलिंग हे काही नवे नाही. अनेकदा सोशल मीडियावर त्यांनी शेअर केलेल्या फोटोंमुळे त्यांना ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. असेच काहीसे ‘बिग बॉस ९’मधील स्पर्धक, मॉडेल आणि अभिनेत्री मंदना करीमीसोबत घडले आहे.

मंदना सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. पण बऱ्याच वेळा तिला सोशल मीडिया पोस्टमुळे ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. काही दिवसांपूर्वी तिने एक टॉपलेस फोटो शेअर केल्यामुळे तिला ट्रोल करण्यात आले होते. ट्रोलिंगला कंटाळून मंदनाने सोशल मीडिया सोडण्याचा निर्णय घेतला. तिने व्हिडीओ शेअर करत हा निर्णय घेतला असल्याचे सांगितले.

‘एक सामान्य व्यक्ती पेक्षा एक सेक्सी मॉडेल\ अभिनेत्री, एक सुंदर चेहऱ्या पेक्षाही… मी सोशल मीडियावर इमानदारपणे आणि खरेपणाने वागत होते. माझा राग करणाऱ्यांवर मी नेहमी प्रेम केले. पण तुम्ही सगळ्यांनी मला फसवले आणि त्रास दिला. मला आणि माझ्या चाहत्यांवर घाणेरड्या शब्दात कमेंट केल्यात’ असे मंदनाने व्हिडीओ शेअर करत म्हटले.

पुढे तिने लिहिले, ‘मी शेअर करत असलेल्या फोटोंमुळे तुम्ही माझ्या विषयी काहीही बोलू शकता असं वाटलं का तुम्हाला? सांगायला मला वाईट वाटते की मी या सगळ्यावर आता उपाय शोधला आहे. सध्या मी इन्स्टाग्रामवरुन जात आहे.’

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 31, 2020 2:23 pm

Web Title: mandana karimi quits instagram after getting trolled avb 95
Next Stories
1 अभिनेता सुबोध भावे आणि कुटुंबाला करोनाची लागण
2 कंगना रणौतच्या लोकप्रियतेला उतरती कळा?; दिवसाला ५० हजार फॉलोअर्स करतायत अनफॉलो
3 “रिया केवळ एक मोहरा, खरा मास्टर माईंड…; सुशांत प्रकरणावर कंगनाचा खळबळजनक दावा
Just Now!
X