05 December 2020

News Flash

४८ व्या वर्षी मंदिरा बेदी झाली एका मुलीची ‘माय’

तिने सोशल मीडिया पोस्टद्वारे एका मुलीला दत्तक घेतल्याची माहिती दिली आहे.

मंदिरा बेदीने चार वर्षांच्या मुलीला दत्तक घेतले आहे. तिचे नाव तारा आहे.

वयाच्या ४८व्या वर्षीही तितकीच हॉट आणि ग्लॅमरस अंदाजात प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री म्हणजे मंदिरा बेदी. नुकताच मंदिराने एका चार वर्षांच्या मुलीला दत्तक घेतले आहे. याबाबतची माहिती मंदिराने सोशल मीडिया पोस्टद्वारे दिली आहे. २८ जुलै २०२० रोजी मंदिराच्या घरी या नव्या पाहुणीचे आगमन झाले आहे.

मंदिराने दत्तक घेतलेल्या मुलीसोबतचा फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत तिने, ‘ही माझी छोटी मुलगी तारा. चार वर्षांपेक्षा थोडी मोठी. तिच्या डोळ्यात ताऱ्यांप्रमाणे चमक आहे. वीरची लहान बहिण. तिचे नाव तारा बेदी कौशल आहे. ती २८ जुलै २०२०पासून आमच्या कुटुंबाचा भाग झाली आहे’ या आशयाचे कॅप्शन दिले आहे.

‘ही तर साडी नाही, लुंगी आणि बिकिनी…’, नव्या लूकमुळे मंदिरा बेदी झाली ट्रोल

मंदिराने शेअर केलेल्या फोटोमध्ये ती पती आणि मुलासोबत दिसत आहे. तसेच त्यांनी सगळ्यांनी पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान केले आहेत. मंदिराच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट करत शुभेच्छा दिल्या आहेत.

मंदिरा बेदीने १९९९ मध्ये चित्रपट दिग्दर्शक राज कौशलशी लग्न केले. मात्र आई होण्यासाठी मंदिराला तब्बल १२ वर्षे वाट पाहावी लागली. अखेर २००१ मध्ये मंदिराने मुलाला जन्म दिला. मंदिराचा मुलगा ९ वर्षांचा आहे. दरम्यान एका मुलाखतीमध्ये मंदिराने मुलीला दत्तक घेण्याची इच्छा व्यक्त केली होती. गेल्या दोन-तिन वर्षांपासून मुलीला दत्तक घेण्याचा प्रयत्न करत असल्याचे मंदिराने सांगितले होते. आता मंदिराने मुलीला दत्तक घेतले असून तिच्या सोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 26, 2020 8:54 am

Web Title: mandira bedi raj kaushal adopt a 4 year old girl avb 95
Next Stories
1 या कारणामुळे रवीनाचं अक्षयशी होऊ शकलं नाही लग्न
2 ड्रग्ज प्रकरणात आणखी एका अभिनेत्रीचं नाव आलं समोर; पोलिसांनी सापळा रचून पकडलं
3 विनयभंग प्रकरणात नवाजुद्दीन सिद्दिकीला न्यायालयाकडून दिलासा
Just Now!
X