News Flash

“कोणत्या झोपडपट्टीतून आणलंय मुलीला?”,असं म्हणणाऱ्यांना मंदिराने फटकारलं!

अभिनेत्री मंदिरा बेदीने तारा या तिच्या मुलीला दत्तक घेतलं आहे

अभिनेत्री मंदिरा बेदी आपल्या व्यावसायिक आयुष्यासोबतच खाजगी आयुष्याबद्दलही चर्चेत असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती आपल्या चाहत्यांच्या कायम संपर्कात असते. तिने आपल्या परिवारासोबतचे काही फोटोही सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोवर काही जणांनी केलेल्या कमेंट्समुळे मंदिरा चांगलीच भडकली आणि तिने या लोकांचा समाचार घेतला.

मंदिराने आपली मुलगी तारा हिच्यासोबतचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले. त्यावर काही लोकांनी असभ्य भाषेत कमेंट्स केल्या आहेत. गेल्या वर्षी मंदिराने आपली मुलगी तारा हिला दत्तक घेतलं. तारा ४ वर्षांची आहे. तारासोबतच्या मंदिराच्या फोटोवर एकाने कमेंट केली की तुम्ही “तुमच्या मुलीला कोणत्या झोपडपट्टीतून आणलंय?” त्याला उत्तर देत मंदिराने त्याला सुनावलं. ती म्हणते, “तुमच्यासारख्या लोकांचा खास उल्लेख करायला हवा. तू माझं लक्ष वेधून घेण्यात यशस्वी ठरलात, बिनकामाच्या माणसा!”

अजून एक युजर म्हणतो, “रस्त्यावरुन घेतलेलं ते मूल तुमच्यापेक्षा फारच वेगळं दिसतंय. तुमच्यासारखे स्वार्थी लोक त्यांना झोपडपट्टीच्या आयुष्याची भीती घालत आहात.” यावर मंदिरा म्हणते, “अजून एक सभ्य नागरिक. हे स्वतःला राजेश त्रिपाठी असं म्हणवतात. हे नक्कीच त्यांचं खरं नाव नाही. कारण असे वेडे लोक सर्वात जास्त घाबरट असतात. त्यांना अनोळखी चेहऱ्यामागे राहून लोकांना वाईटसाईट बोलायची सवय असते.”
मंदिराने गेल्या वर्षी आपली मुलगी ताराला दत्तक घेतल्याचं जाहीर केलं होतं. मंदिराच्या पतीनेही तारा आपल्या घरात आल्याचा आनंद सोशल मीडियावर व्यक्त केला होता.

मंदिराने जाहिरात क्षेत्रात बरंच काम केलं आहे. नव्वदच्या दशकात ती ‘शांती’, ‘क्योंकी सास भी कभी बहु थी’ अशा मालिकांमधून घराघरात पोहोचली. तिने काही काळ क्रिकेट सामन्यांचं समालोचनही केलं. १९९९ साली तिने राज कौशिकशी लग्न केलं आणि २०११ मध्ये वीर या आपल्या मुलाला जन्म दिला. तिने अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्येही काम केलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 13, 2021 3:51 pm

Web Title: mandira bedi replies to hate comments about her daughter vsk 98
Next Stories
1 “जगात करोना तर आमच्यासाठी करोना आणि करीनासुद्धा!” – आमीर खान
2 महिलेने तोंडाऐवजी केसाला लावले मास्क, अभिनेत्रीने शेअर केला फोटो
3 नवीन वर्षांच्या शुभेच्छा देत RRRच्या टीमने शेअर केलं नवीन पोस्टर
Just Now!
X