27 October 2020

News Flash

इंटरनेटवर मंदिरा बेदीच्या ‘त्या’ फोटोने खळबळ, चाहते झाले घायाळ

या फोटोमध्ये मंदिरा अत्यंत हॉट आणि ग्लॅमरस अंदाजात दिसत आहे

बॉलिवूड अभिनेत्री मंदिरा बेदी सध्या मालदीवमध्ये सुट्ट्यांचा आनंद लूटत आहे. दरम्यान मंदिराचा एक फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. या फोटोमध्ये मंदिरा अत्यंत हॉट आणि ग्लॅमरस अंदाजात दिसत आहे.

मंदिराने नुकताच तिच्या इन्स्टाग्रा अकाऊंटवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये मंदिराने लाल रंगाची बिकिनी परिधान केली आहे. तिचा हा हॉट लूक चाहत्यांच्या मनावर राज्य करत आहे. दरम्यान मंदिराचा हा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. चाहत्यांनी तिच्या या फोटोवर कमेंटचा वर्षाव केला आहे. त्यामध्ये अभिनेत्री मौनी रॉयने देखील ‘हॉट’ अशी कमेंट केली आहे.

मंदिरा आता ४७ वर्षांची असून तिला ८ वर्षांचा मुलगा आहे. तिने चित्रपट निर्माता  राज कौशलसोबत लग्न केले. मंदिरा तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर नेहमी जिममध्ये वर्कआऊट करतानाचे व्हिडीओ शेअर करत असते. यावरुन मंदिरा फिटनेसविषयी जागरुक असल्याचे दिसून येते.

सध्या मंदिरा तिचा आगमी चित्रपट ‘साहो’मध्ये व्यग्र आहे. या चित्रपटात दाक्षिणात्य सुपर स्टार प्रभास आणि श्रद्धा कपूर मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. . ‘साहो’मध्ये प्रभास एका गुप्तहेराच्या भूमिकेत झळकणार आहे. हा चित्रपट तेलगू, तामिळ आणि हिंदी अशा तीन भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. सुजीत यांनी दिग्दर्शित या चित्रपटात श्रद्धा कपूरशिवाय नील नितीन मुकेश, जॅकी श्रॉफ, मंदिरा बेदी, चंकी पांडे, महेश मांजरेकर यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. हा चित्रपट ३० ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 23, 2019 5:22 pm

Web Title: mandira bedi share hot photo on instagram avb 95
Next Stories
1 ‘छत्रीवाली’ मालिकेतील विक्रमच्या ‘कबीर सिंग’ लूकची चर्चा
2 विद्या बालन पहिल्यांदाच करणार या लघूपटाची निर्मिती
3 रणबीरसोबत लग्नाची तयारी सुरू; आलियाने सब्यसाचीकडून ऑर्डर केला लेहंगा?
Just Now!
X