15 December 2017

News Flash

‘शक्तिमान’मधील ‘किलविश’ दिसते; सोशल मीडियावर मंदिराची खिल्ली

तिने आपल्या वजनावर नियंत्रण ठेवत दुसऱ्यांना एक आदर्श घालून दिला

लोकसत्ता ऑनलाइन | Updated: August 13, 2017 7:48 PM

मंदिरा बेदी

अभिनेत्री मंदिरा बेदी सोशल मीडियावर फार सक्रिय असते. ती नेहमीच इन्स्टाग्राम अकाऊंटवर आपले फोटो शेअर करतत असते. नेहमीप्रमाणे मंदिराने असाच एक फोटो शेअर केला. ब्लॅक अण्ड व्हाइट अशा या फोटोमध्ये पांढऱ्या रंगाचा कप़डा तिने डोक्यावर ओढलेला आहे. तिच्या या फोटोमध्ये ती फारच मादक दिसते यात काही शंका नाही. लोकांकडून अशाच काही प्रशंसेची अपेक्षा तिने केली असेल पण प्रत्यक्षात मात्र झालं उलटच. युझर्सने हा फोटो त्यांच्या नजरेतून पाहिला आणि या फोटोला कमेंट दिल्या.

#saturdaysoul #blackandwhiteonly @rafique_sayed @im__sal

A post shared by Mandira Bedi (@mandirabedi) on

एका युझरने तर ‘तू शक्तिमानमधील किलविशसारखी दिसते,’ असं लिहिलं. मंदिराही या कमेंट पाहून नक्कीच हसली असेल. मंदिरा आपल्या फिटनेसबाबतीत नेहमीच जागरुक असते. बाळंतपणाच्या काळात मंदिराचे वजन सुमारे २० किलोंनी वाढले होते. पण नंतर तिने आपल्या वजनावर नियंत्रण ठेवत दुसऱ्यांना एक आदर्श घालून दिला.

😘❤️ #danishsummer

A post shared by Mandira Bedi (@mandirabedi) on

Bliss. Happiness. 😍🙏🏼 #danishsummer

A post shared by Mandira Bedi (@mandirabedi) on

४५ वर्षीय मंदिरा फार फिट आहे. तिच्या फिटनेसकडे पाहून तिच्या वयाचा अंदाज येणे शक्य नाही. टिव्ही मालिका ‘शांति’मधून मंदिराला खरी ओळख मिळाली. मंदिराने दिग्दर्शक आणि निर्माता राज कौशल याच्याशी लग्न केले आहे. मंदिराने १९९५ मध्ये आलेल्या ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’ या सिनेमात काम केले आहे.

#saturdaysoul #blackandwhiteonly @rafique_sayed @im__sal

A post shared by Mandira Bedi (@mandirabedi) on

योग्य खा आणि योग्य जगा असा फिटनेस मंत्रा ती सर्वांना देते. योग्य खाणं आणि योग्य वेळी खाणं फार आवश्यक असल्याचं तिने सांगितलं. तळलेलेब पदार्थ तिने आपल्या जेवणातून वर्ज्य केले आहेत. दूध पिणं, फळं खाणं यासोबतच 20 मिनिटं व्यायाम करण्याचा आणि भरपूर पाणी पिण्याचा सल्ला ही ती अनेकांना देते.

First Published on August 13, 2017 7:45 pm

Web Title: mandira bedi shares hot picture on social networking site instagram getting viral on internet