25 November 2020

News Flash

…म्हणून लग्नानंतरही १२ वर्षे मंदिरा बेदी होऊ शकली नाही आई

एका मुलाखती दरम्यान मंदिराने हा खुलासा केला आहे

वयाच्या ४७व्या वर्षीही तितकीच हॉट आणि ग्लॅमरस अंदाजात प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री म्हणजे मंदिरा बेदी. आजही मंदिरा बेदीकडे फिटनेस आयकॉन म्हणूनही पाहिले जाते. ‘शांती’ मालिकेपासून ते ‘क्यों की सास भी कभी बहुती’ मालिकेपर्यंत मंदिराने छोट्या भडद्यावर जादू केली होती. नुकताच मंदिरा दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभासच्या ‘साहो’ चित्रपटामध्ये झळकली. दरम्यान एका मुलाखतीमध्ये मंदिराने तिला आई होण्याचा अनुभव लग्नानंतर तब्बल १२ वर्षांनी घेतला आल्याचा खुलासा केला. नतंर मंदिराने त्यामागील कारणही सांगितले आहे. हे कारण ऐकून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.

हिंदूस्तान टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार मंदिरा बेदीने १९९९मध्ये चित्रपट दिग्दर्शक राज कौशलशी लग्न केले. मात्र आई होण्यासाठी मंदिराला तब्बल १२ वर्षे वाट पाहावी लागली. ‘मी केलेल्या करारामुळे २००१ मध्ये वयाच्या ३९व्या वर्षी मी माझ्या मुलाला जन्म दिला. मला भीती वाटायची की जर मी गर्भवती झाले तर माझ्या करिअरला पूर्ण विराम लागेल’ असे मंदिरा म्हणाली.

‘कधी कधी हे मनोरंजन क्षेत्र क्रूर आहे असे वाटते. इथे कधी काय होईल कोणीच सांगू शकत नाही. पण या इंडस्ट्रीमध्ये निभावण्यासाठी माझ्या नवऱ्याने मला पाठिंबा दिला. त्याच्या पाठिंब्याशिवाय मी या इंडस्ट्रीमध्ये जगू शकले नसते’ असे मंदिरा पुढे म्हणाली.

काही दिवसांपूर्वी मंदिरा पती आणि मुलासोबत मालदीवमध्ये सुट्ट्यांचा आनंद लूटत असल्याचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. या फोटोमध्ये मंदिरा अत्यंत हॉट आणि ग्लॅमरस अंदाजात दिसत आहे. या फोटोंवरुन फिटनेसविषयी जागरुक असल्याचे दिसून येते होते. नुकताच मंदिराचा ‘साहो’ चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटात प्रभास मुख्य भूमिकेत होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 19, 2019 4:18 pm

Web Title: mandira bedi speaks about her pregnancy avb 95
Next Stories
1 Video: बॉडीगार्डशी उद्दामपणे वागणाऱ्या आलियावर नेटकरी भडकले
2 Video : ‘स्ये रा नरसिम्हा रेड्डी’चा ट्रेलर प्रदर्शित
3 Photo : आयफा अ‍ॅवॉर्डमधील ‘या’ तरुणीमुळे होते सलमानची चर्चा
Just Now!
X