25 January 2021

News Flash

अभिनेता मनीष पॉलला करोनाची लागण

चित्रीकरणादरम्यान मनीष पॉलला करोनाची लागण

बॉलिवूड अभिनेता आणि विनोदवीर मनीष पॉल याला करोनाची लागण झाली आहे. जुग जुग जियो या चित्रपटाचं चित्रीकरण सुरु असतानाच त्याला करोनाची लागण झाली. गेल्या काही दिवसांपासून मनीषला करोनाची लक्षण जाणवत होती. त्यानंतर केलेल्या चाचणीमध्ये त्याचे रिपोर्ट्स पॉझिटिव्ह आले आहेत. अशी माहिती ‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या वृत्तात नमूद करण्यात आली आहे.

गेल्या काही दिवसांपासून मनीष ‘जुग जुग जियो’ या आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त होता. याच काळात त्याला करोनाची लागण झाली. त्यानंतर मनीष मुंबईत परतला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Maniesh Paul (@manieshpaul)

दरम्यान, मनीष पॉलपूर्वी अभिनेता वरुण धवनलादेखील करोनाची लागण झाली आहे. मनीष आणि वरुण लवकरच ‘जुग जुग जियो’ या चित्रपटात झळकणार आहेत. या चित्रपटाचं दिग्दर्शन राज मेहता करत असून अभिनेत्री नीतू कपूर बऱ्याच वर्षानंतर या चित्रपटाच्या माध्यमातून रुपेरी पडद्यावर पुन्हा पदार्पण करणार आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 7, 2020 1:16 pm

Web Title: maniesh paul tests covid 19 positive after varun dhawan neetu kapoor during shooting ssj 93
Next Stories
1 बॉलिवूडकरांचा शेतकरी आंदोलनाला पाठिंबा, म्हणाले…
2 ब्रेन स्ट्रोकच्या झटक्यानंतर पहिल्यांदा समोर आला राहुल रॉयचा व्हिडीओ, म्हणाला…
3 “माझ्या पत्नीने धर्मपरिवर्तन केलंय”, राहुल महाजनचा खुलासा
Just Now!
X