चित्रपटसृष्टीत अनेक गोष्टी जशा दिसतात तशा त्या बिलकूल नसतात हे एव्हाना प्रेक्षकांच्या लक्षात आलं असेलच. याच म्हणीला साजेसा असा एक भन्नाट व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ आहे कंगनाच्या ‘मणिकर्णिका ‘द क्वीन ऑफ झांशी’ चित्रपटातला .
‘मणिकर्णिका’साठी तलवारबाजी, घोडेस्वारीचं विशेष प्रशिक्षण घेणाऱ्या कंगनाचा एका व्हिडिओ लीक झाला आहे. हा व्हिडिओ कंगनाला जरी आवडला नसला तरी तिच्या चाहत्यांना मात्र तो खळखळून हसायला लावेल हे नक्की.
— Sailing Cloud (@twinitisha) February 21, 2019
‘मणिकर्णिका’च्या क्लायमॅक्सचं चित्रीकरण सुरू असताना कंगना युद्धाच्या पवित्र्यात आपल्या सैन्यासह रणांगणात उभी असल्याचं दिसून येत आहे. घोड्यावर स्वार झालेल्या कंगानाच्या मागे असंख्य घोडेस्वार युद्धाच्या पवित्र्यात उभे असल्याचं या व्हिडिओत दिसत आहे. पण गंमत म्हणजे शुटींगसाठी सगळ्यांकडे खरे घोडे होते मात्र कंगना ही एकमेव खोट्या घोड्यावर स्वार होती.
तिचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अनेकांनी या व्हिडिओवरून कंगनाला ट्रोल केलं आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on February 21, 2019 5:55 pm