२०१९मधील सर्वाधिक चर्चेत ठरलेला चित्रपट म्हणजे मणिकर्णिका: द क्वीन ऑफ झांसी. या चित्रपटामध्ये अभिनेत्री कंगना रणौत हिने राणी लक्ष्मीबाई यांची भूमिका साकारली असून कंगनाने या चित्रपटाचं दिग्दर्शनही केलं आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून पहिल्यांदाच दिग्दर्शकीय क्षेत्रात पदार्पण करणाऱ्या कंगनाचा प्रयत्न यशस्वीही ठरला. पहिल्या दिवसापासून तिकीटबारीवर राज्य करणाऱ्या या चित्रपटाने तब्बल १०० कोटींचा गाठला आहे.

मणिकर्णिकाने पहिल्या आठवड्यात ६१.५१ कोटींची कमाई केली होती. त्यानंतर दुसऱ्या आठवड्यात २४.३९ कोटी, तिसरा आठवडा ११.६४ कोटी, चौथा आठवडा २.५१ कोटी अशी कमाई केली होती. त्यात्यामुळे या चित्रपटाने एकूण १०५ कोटींची कमाई केल्याचं स्पष्ट झालं आहे.

या चित्रपटामध्ये भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या झाशीच्या राणीची शौर्यगाथा सांगण्यात आली आहे. हा चित्रपट देशभरातील जवळपास ३००० स्क्रिन्सवर प्रदर्शित झाला होता. विशेष म्हणजे या चित्रपटाच्या माध्यमातून छोट्या पडद्यावरील अभिनेत्री अंकिता लोखंडेने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे. अंकिताने झलकारीबाईंची भूमिका वठविली असून तिचा अभिनयही वाखाणण्याजोगा होता.