कंगना रणौत आणि हृतिक रोशन यांच्यातील वाद हा काही बॉलिवूडला नवा नाही. हा वाद दोन वर्ष जुना असला तरी आपल्या अनेक मुलाखतीतून कंगना हृतिकवर शाब्दिक वार करायची संधी सोडत नाही. या आठवड्यात कंगनाचा ‘मणिकर्णिका’ हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आला. या ट्रेलरमधील एक संवाद हा हृतिकच्या ‘मोहेंजो दारो’ चित्रपटातील संवादाशी साधर्म्य असणारा होता. योगायोग म्हणजे दोन्ही चित्रपटांचे ट्रेलर याच संवादावर संपत होते. त्यामुळे कंगानाच्या ‘मणिकर्णिका’मध्ये हृतिकच्या चित्रपटातील संवाद कॉपी केल्याची चर्चा सोशल मीडियावर खूपच रंगली होती. या सगळ्या चर्चांवर कंगनानं तिच्या स्टाईलनं सडेतोड उत्तर दिलं आहे. संवाद कॉपी करण्याचा संबध येतोच कुठे मोहेंजो दारो पाहिलाय कोणी? असा टोमणा कंगनानं मारला आहे.

काय आहे संवाद
‘झांसी आप भी चाहते हैं और हम भी, फर्क सिर्फ इतना है कि आपको राज करना है और मुझे अपनों की सेवा’ असं वाक्य ‘मणिकर्णिका’च्या ट्रेलरमध्ये कंगना म्हणताना दिसत आहे.  तर मोहेंजो दारो ‘अंतर है महम तू मोहेंजो दारो पे राज करना चाहता है और मे सेवा’ हे वाक्य हृतिकच्या तोंडी आहे. या दोन्ही वाक्यात बरंच साधर्म्य असल्याचं नेटकऱ्यांचं म्हणणं आहे. मात्र सोशल मीडियावर सुरू असलेल्या चर्चेला सडेतोड उत्तर देत संवाद कॉपी न केल्याचं कंगनानं मणिकर्णिकाच्या प्रमोशनदरम्यान   स्पष्ट केलं आहे.

Watch waiter’s priceless reaction to sketch artist's sweet surprise
न मिळालेल्या कौतुकाची पोचपावती! कलाकारानं हॉटेलच्या बिलवर रेखाटलं वेटरचं सुरेख चित्र; चेहऱ्यावर उमटलं सुंदर हास्य, Video Viral
prashant damle birthday special article
प्रशांत दामले : ‘बेस्ट’मध्ये नोकरी ते रंगभूमीचा ‘विक्रमादित्य’, व्यवहार कुशल निर्मात्याचा बहुरुपी प्रवास
sanjay-leela-bhansali-priyanka-chopra
नऊ वर्षांनी प्रियांका चोप्रा झळकणार संजय लीला भन्साळी यांच्या चित्रपटात; देसी गर्ल लवकरच करणार घोषणा
two groups of bjp leaders clash during meeting
मिरा भाईंदर मधील भाजपच्या दोन गटात तुफान हाणामारी; मेहता विरुद्ध व्यास गटाचे मतभेद शिगेला

काय म्हणाले दिग्दर्शक
‘हे वाक्य कोणत्याही राजकारण्याच्या तोंडून तुम्हाला सहज ऐकायला मिळेल त्यामुळे ते कोणत्याही चित्रपटामधून कॉपी करण्यात आलेले नाही’, असं दिग्दर्शक कमल जैन यांनी स्पष्ट केलं आहे.