‘बॉलिवूडची क्वीन’ कंगाना रणौत हिच्या बहुप्रतिक्षित ‘मणिकर्णिका’ या चित्रपटाविषयी सगळ्यांनाच कुतूहल आहे. या चित्रपटाचा पहिला टीझर २ ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे. पण तत्पुर्वी कंगनाचे कधीही न पाहिलेले फोटो ‘टीम कंगना रणौत’ या तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आले आहेत.

https://www.instagram.com/p/BoYDN9CBsQk/

मुलाला पाठीला बांधून इंग्रजांविरुद्ध युद्धभूमीवर लढणाऱ्या या रणरागिणीच्या रुपात कंगना या फोटोंमध्ये दिसत आहे. झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या जीवनावर आधिरीत या चित्रपटात कंगना ‘मणिकर्णिका’ म्हणजेच राणी लक्ष्मीबाई यांच्या भूमिकेत आहे. २५ जानेवारीला हा चित्रपट प्रदर्शित होत आहे.

https://www.instagram.com/p/BoS-sJUghHk/

आतापर्यंत कधीही न ऐकलेली राणीची वेगळी गोष्ट ‘मणिकर्णिका’तून उलगडत जाणार आहे. या राणीचा प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटेल असा विश्वास कंगनानं व्यक्त केला आहे. या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धूरा कंगनानं सांभाळली आहे.

https://www.instagram.com/p/BoYNBYqh2x2/

यापूर्वी कंगनानं कधीही ऐतिहासिक भूमिका साकारली नव्हती त्यामुळे तिला या भूमिकेत पाहण्यासाठी तिचे चाहतेही उत्सुक आहेत पण त्याचबरोबर ती पहिल्यांदाच दिग्दर्शनाची भूमिकाही निभावताना दिसणार आहे.