News Flash

वैभव तत्ववादी- अंकिता लोखंडे यांच्या नात्यात नवा बहर

सिनेमाच्या सेटवरच अंकिता आणि वैभवची ओळख झाली

मराठी सिनेसृष्टीतील चॉकलेट बॉय वैभव तत्ववादी आणि हिंदी टेलिव्हिजनवर अधिराज्य गाजवलेली अंकिता लोखंडे प्रथमच एका सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. हा सिनेमा कोणता असेल हे तर एव्हाना साऱ्यांनाच माहित पडले आहे. कंगना रणौतची मुख्य भूमिका असलेल्या ‘मणिकर्णिका- द क्वीन ऑफ झांसी’ या सिनेमात वैभव- अंकिताची जोडी पाहता येणार आहे.

सिनेमाच्या सेटवरच अंकिता आणि वैभवची ओळख झाली. अभिनेत्री प्रार्थना बेहरे ही अंकिताची फार चांगली मैत्रीण असून ती वैभवचीही तेवढीच जवळची मैत्रीण आहे. जेव्हा वैभव अंकिताला भेटणार होता, त्याआधीच प्रार्थनाने अंकिता कशी आहे याची स्तुतीसुमनं वैभवसमोर गायली होती. चित्रीकरणादरम्यानही त्यांची मैत्री फुलत गेली. खाणं, अध्यात्म आणि चिंतन या तीनही विषयात या दोघांची आवड सारखी असल्यामुळे त्यांची मैत्री अधिक घट्ट होत गेली.

‘मणिकर्णिका- द क्वीन ऑफ झांसी’ हा सिनेमा झाशीच्या राणीवर आधारित आहे. वैभव आणि अंकिता यांनी या सिनेमाच्या माध्यमातून पहिल्यांदाच एकत्र स्क्रिन शेअर केली आहे. सध्या राजस्थानमधील बिकानेरमध्ये या सिनेमाचे चित्रीकरण सुरू आहे. अंकिताबद्दल बोलताना वैभव म्हणाला की, ‘आम्ही दोघंही प्रचंड फुडी आहोत. आम्ही एकत्र असलो की आमचं डाएट कुठल्या कुठे पळून जातं. काही दिवसांपूर्वी आम्ही दालबत्ती, गाजराचा हलवा आणि आईस्क्रीमवर ताव मारला होता. आम्ही हे पदार्थ खाण्यासाठी खास अलसिसार इथे गेलो होतो. जयपूरपासून अलसिसार हे तीन तासांवर आहे. केवळ दालबत्ती आणि आईस्क्रीम खाण्यासाठी आम्ही तीन तास प्रवास करून गेलो.’ एवढंच नव्हे तर वैभव म्हणाला की, त्याच्या प्रमाणेच अंकिताही फार धार्मिक आहे. त्या दोघांमध्ये आध्यात्मिक गोष्टींवर अनेक चर्चा होतात.

वैभवच्या आगामी सिनेमाबद्दल बोलायचे झाले तर मणिकर्णिकेआधी त्याचा ‘व्हॉट्सअॅप लग्न’ हा मराठी सिनेमा येत्या १६ मार्चला प्रदर्शित होत आहे. या सिनेमात वैभवसोबत प्रार्थना बेहरेची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. प्रार्थना आणि वैभवचा हा एकत्रित असा तिसरा सिनेमा आहे. याआधी वैभव आणि प्रार्थनाने ‘कॉफी आणि बरंच काही’, ‘मिस्टर अॅण्ड मिसेस सदाचारी’ आणि आता प्रदर्शित होऊ घातलेला ‘व्हॉट्सअॅप लग्न’ या तीन सिनेमांत एकत्र काम केले आहे. सिनेमांमधील ही हिट जोडी ठरणार का हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 23, 2018 4:32 pm

Web Title: manikarnika star vaibhav tatwawadi and ankita lokhande are giving new friendship goals
Next Stories
1 भावनिक, नैराश्यग्रस्त होणं मला परवडणारं नाही- सलमान खान
2 PHOTO : ‘त्यांच्या’ हसण्यावर खिलाडी कुमार भाळला
3 रणबीरची शेवटची आठवणही दीपिकाने मिटवली?
Just Now!
X