04 March 2021

News Flash

‘मणिकर्णिका’मधील अंकिताचा लूक व्हायरल

सिनेमात अंकिताने झलकारी बाईची व्यक्तिरेखा साकारली आहे

पवित्र रिश्ता या हिंदी मालिकेतून घराघरात पोहोचलेली टीव्ही अभिनेत्री अंकिता लोखंडे आता मणिकर्णिका- द क्वीन ऑफ झांसी सिनेमातून सिनेसृष्टीत पदार्पण करत आहे. या सिनेमात कंगना झाशीची राणी लक्ष्मी बाईची भूमिका साकारणार आहे. तर अंकिता झलकारी बाईच्या व्यक्तिरेखेत दिसेल. काही दिवसांपूर्वी कंगनाचे सेटवरचे अनेक फोटो व्हायरल झाले होते. प्रेक्षकांना कंगनाचा या सिनेमातील लूक तुफान आवडला. आता अंकिताच्या लूकचा फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

या सिनेमात अंकिताने झलकारी बाईची व्यक्तिरेखा साकारली आहे. व्हायरल झालेल्या फोटोमध्ये अंकिताने हिरव्या आणि लाल रंगाची खणाची साडी नेसली आहे. या फोटोत तिची नजर खाली असून तिच्या मागे झाडंही दिसत आहेत. तर तिच्या एका बाजूला लॅम्प दिसत आहेत. तिचा लूक आणि इतर साहित्य पाहून हा मणिकर्णिका सिनेमाच्या सेटवरीलच फोटो आहे असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही.

अंकिताच्या फोटोआधी कंगनाचा झाशीच्या राणीचा लूक लिक झाला होता. या फोटोमध्ये कंगनाने पांढऱ्या रंगाचा ड्रेस घातला होता. या ड्रेससोबत तिने पांढऱ्या रंगाची पगडीही घातली होती. यानंतर कंगनाने किरमीजी रंगाची साडी नेसलेला फोटो व्हायरल झाला होता. या फोटोत कंगनाने तिचे केस बांधलेले आहेत आणि केसात गुलाबाची फुलं माळली आहेत. या फोटोत कंगनाने खूप सारे दागिनेही घातले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 16, 2018 5:38 pm

Web Title: manikarnika tv serial pavitra rishta actress ankita lokhande manikarnika look from the kangana ranaut film see picture
Next Stories
1 Katrina Kaif ki Hichki: ‘कतरिनाचं नृत्यकौशल्य शून्य’
2 इरफान खानला न्यूरोएन्डोक्राइन ट्यूमर
3 सुनील ग्रोवर, शिल्पा शिंदे कपिल शर्माविरुद्ध उभे ठाकणार?
Just Now!
X