एक काळ नायिका म्हणून हरएक भूमिका मग ती तद्दन मसाला चित्रपटातून असेल किंवा आशयघन चित्रपटातून असेल बाखूबी निभावणारी सुंदर अभिनेत्री म्हणजे मनीषा कोईराला. आज १६ ऑगस्ट रोजी मनीषा कोईराला तिचा ४९वा वाढदिवस साजरा करत आहे. मनीषा ही मूळची भारतीयनसून ती नेपाळची आहे. तिचे आजोबा नेपाळचे २२वे पतंप्रधान होते. मनीषाने १९८९मध्ये नेपाळी चित्रपट ‘फेरी भेटौला’मधून अभिनयाच्या करिअरला सुरुवात केली.

१९९१मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘सौदागर’ चित्रपटातून मनीषाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. परंतु त्यानंतर मनीषाच्या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई केली नाही. त्यानंतर मनीषाने ‘1942: अ लव्ह स्टोरी’ या चित्रपटात काम केले. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आणि मनीषा कोईराला अखेर प्रकाश झोतात आली. त्यानंतर तिने अग्नि साक्षी, इंडियन, गुप्त: द हिडन ट्रूथ, कच्चे धागे, कंपनी आणि एक छोटी सी लव स्टोरी या चित्रपटांमध्ये काम केले.

Rohit Sharma Talking about his retirement in the Breakfast with Champions show
रोहित शर्मा कधी म्हणणार क्रिकेटला अलविदा? हिटमॅनने निवृत्तीबाबत केलं मोठं वक्तव्य
Shekhar Suman says Kangana Ranaut Adhyayan were happy together
“कंगना रणौत व माझा मुलगा एकत्र आनंदी होते,” अभिनेत्रीच्या एक्स बॉयफ्रेंडच्या वडिलांचं विधान; म्हणाले, “त्या दोघांच्याही…”
amruta khanvilkar
‘नवनव्या भूमिकांचे आव्हान स्वीकारण्यात आनंद’
suparna shyam play important role in new show
निलेश साबळेच्या नव्या शोमध्ये झळकणार ‘लग्नाची बेडी’ फेम अभिनेत्याची पत्नी! आजवर लोकप्रिय मालिकांमध्ये केलंय काम

मनीषा कोईरालाने १९९६मध्ये ‘अग्नि साक्षी’ या चित्रपटात नाना पाटेकरांसोबत काम केले. दरम्यान दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले आणि ऐकमेकांना डेट करु लागले. त्यानंतर नाना आणि मनीषाने संजय लीला भंसाळी यांच्या ‘खामोशी’ चित्रपटात एकत्र काम केले. दोघांची ऑन स्क्रीन केमिस्ट्री पाहण्यासारखी होती. या चित्रपटानंतर त्यावेळी दोघांच्या नात्याच्या चर्चा रंगल्या होत्या. काही दिवसानंतर मनीषा आणि नानांनमध्ये भांडण सुरु झाले आणि त्यांच्या नात्याला पूर्णविराम लागला.

अखेर १९ जून २०१०मध्ये मनीषा कोईरालाने नेपाळमधील उद्योगपती सम्राट दहलसह लग्न केले. मनीषा आणि सम्राटची ओळख एका सोशल नेटवर्किंग साईटद्वारे झाली होती. परंतु त्या दोघांचे नाते जास्त काळ टिकू शकले नाही. २०१२मध्ये मनीषा आणि सम्राटचा घटस्पोट झाला.