07 August 2020

News Flash

मैत्रिणींच्या घोळक्यात बसलेल्या ‘या’ अभिनेत्रीला ओळखलंत का?

कलाविश्वातील 'ही' लोकप्रिय अभिनेत्री आहे

बॉलिवूड सेलिब्रिटी अनेक वेळा सोशल मीडियावर त्यांचे जुने फोटो, व्हिडीओ शेअर करुन जुन्या आठवणींना उजाळा देत असतात. या लॉकडाउनच्या काळात अनेक सेलिब्रिटींनी असेच काही फोटो शेअर केले. यात अमिताभ बच्चनपासून ते राधिका आपटेपर्यंत अनेक कलाकारांनी त्यांच्या लहानपणीचे, कॉलेजजीवनातील फोटो शेअर केल्याचं पाहायला मिळालं. यामध्येच बॉलिवूडमधील एका लोकप्रिय अभिनेत्रीनेदेखील तिच्या कॉलेजजीवनातील एक फोटो शेअर केला आहे. त्यामुळे सध्या हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

मूळची नेपाळची असलेली अभिनेत्री मनिषा कोईरालाने तिच्या कॉलेजजीवनातील एक फोटो ट्विटरवर शेअर केला आहे. या फोटोमध्ये ती तिच्या मैत्रिणींच्या घोळक्यात बसली असून या तिच्या बेस्टफ्रेंड असल्याचं तिने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे.

मनिषाचा हा फोटो पाहिल्यावर तिला पटकन ओळखणं कठीण असल्याचं दिसून येतं. परंतु, तिने हा फोटो शेअर केल्यामुळे चाहत्यांनी त्यावर कमेंट्स आणि लाईक्सचा पाऊस पाडला आहे.

 

View this post on Instagram

 

People of hills.. Outfit- @manishmalhotra05 Makeup&hair- @rashmishastri

A post shared by Manisha Koirala (@m_koirala) on

दरम्यान, मनिषाने १९८९ मध्ये नेपाळी चित्रपट ‘फेरी भेटौला’मधून अभिनयाच्या करिअरला सुरुवात केली. १९९१ मध्ये ‘सौदागर’ या चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. विशेष म्हणजे‘1942: अ लव्ह स्टोरी’ या चित्रपटातून ती खऱ्या अर्थाने नावारुपाला आली. या चित्रपटानंतर तिने ‘अग्नि साक्षी’, ‘इंडियन’, ‘गुप्त: द हिडन ट्रूथ’, ‘कच्चे धागे’, ‘कंपनी’ आणि ‘एक छोटी सी लव स्टोरी’ या चित्रपटांमध्ये काम केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 11, 2020 4:36 pm

Web Title: manisha koirala unseen pic with friends ssj 93
Next Stories
1 सुशांतच्या चाहत्यांची अनोखी श्रद्धांजली; रस्त्याला व चौकाला दिलं सुशांतचं नाव
2 रेखा यांच्या सुरक्षारक्षकाला करोनाची लागण; बंगला केला सील
3 ‘त्या’ वादानंतर स्टँडअप कॉमेडियनने मागितली माफी; हटवला वादग्रस्त व्हिडीओ
Just Now!
X