News Flash

अशी आहे मनिषाच्या ‘द बुक ऑफ अनटोल्ड स्टोरी’ची पहिली झलक

या पुस्तकाचं नाव 'द बुक ऑफ अनटोल्ड स्टोरीज' असं आहे.

मनिषा कोईराला

‘संजू’ चित्रपटामध्ये दिवंगत ज्येष्ठ अभिनेत्री नर्गिस दत्त यांची भूमिका हुबेहूब वठविणाऱ्या मनिषा कोईरालाच्या पुस्तकाचा फर्स्ट लूक प्रदर्शित झाला आहे. कर्करोगाशी झुंज दिलेल्या मनिषाने आपली जीवनकथा शब्दबद्ध करायचे ठरवलं होतं आणि त्यानुसार तिने तिची ही कथा पुस्तक स्वरुपात चाहत्यांच्या भेटीलाही आणली आहे.

मनिषाने कर्करोगावर केलेली मात, तिचा संघर्ष याविषयीच्या तिच्या भावना पुस्तकातून व्यक्त केल्या आहेत. या पुस्तकाचं नाव ‘द बुक ऑफ अनटोल्ड स्टोरीज’ असं असून तिने इन्स्टाग्रामच्या माध्यमातून या पुस्तकाची पहिली झलक दाखविली आहे.

‘पेंग्विन इंडिया आणि गुरवीन चढ्ढा आपल्या दोघांचे मनापासून आभार. माझ्या जीवन प्रवास उलगडण्यासाठी मला प्रोत्साहित केल्यामुळे धन्यवाद. माझं पहिलं पुस्तक. आशा आहे हे पुस्तक साऱ्यांच्या पसंतीत उतरेल आणि नक्कीच माझ्या या संघर्षातून लोक चांगली प्रेरणा घेतली’, असं मनिषाने यावेळी म्हटलं.

मनिषाला कर्करोग झाल्याचं २०१२ साली निदान झालं होतं. याचवेळी तिने आपला हा अनुभव पुस्तक रुपात मांडण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार तिने या पुस्तकातून व्यक्त होण्याचा प्रयत्न केला आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 10, 2018 10:43 am

Web Title: manisha koirala wrote her first book titled
Next Stories
1 माझी नक्कल करतेवेळी मर्यादा न ओलांडण्याची ताकीद सोनाक्षीने कपिलला दिली होती- शत्रुघ्न सिन्हा
2 ..म्हणून प्रियांका करतेय सलमानची मनधरणी
3 फरहानसोबतच्या नात्याविषयी शिबानीने अखेर सोडलं मौन
Just Now!
X