29 March 2020

News Flash

दिग्दर्शका विरोधात अभिनेत्रीची पोलिसात तक्रार

केरळचे डीजीपी लोकनाथ बेहरा यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे

मल्याळम चित्रपटसृष्टीमधील लोकप्रिय अभिनेत्री मंजू वॉरिअरने दिग्दर्शक आणि चित्रपट निर्माते वी. ए. श्रीकुमार मेनन यांच्यावर मानहानी केल्याचा आरोप केला आहे. तिने केरळचे डीजीपी लोकनाथ बेहरा यांची भेट घेऊन याप्रकरणी तक्रार दिली आहे. मंजू आणि मेनन यांनी ‘ओडियान’ (Odiyan) या चित्रपटात एकत्र काम केले आहे. मेनन यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. श्रीकुमार मेनन माझी प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप मंजूने केला आहे.

सोशल मीडिया कँपेनद्वारे श्रीकुमार माझी प्रतिमा मलिन करण्यासाठी षडयंत्र रचत असून माझ्या मित्रमैत्रीणींना धमकी देत आहेत असे मंजूने तक्रारीमध्ये म्हटले आहे. तसेच मेननपासून माझ्या जीवाला धोका आहे असे मंजूने म्हटले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ‘मंजू वॉरिअर फाउंडेशन’च्या लेटर पॅड आणि सही केलेल्या कोऱ्या चेकचा श्रीकुमार गैरवापर करु शकतात असे सांगत त्यांच्यापासून माझ्या जिवाला धोका आहे, असा आरोप तिने केला आहे. तक्रारीसोबत मंजूने काही डिजिटल स्वरूपातील पुरावे पोलिसांकडे सादर केले आहेत.

आणखी वाचा : रितेश म्हणाला लव्ह यू; विद्या बालननं दिला भन्नाट रिप्लाय

मंजू आणि श्रीकुमार यांनी अनेक जाहिरांतीमध्ये एकत्र काम केले आहे. तसचे ‘ओडियन’ या चित्रपटातही त्या दोघांनी एकत्र काम केले होते. हा चित्रपट १४ डिसेंबर २०१८ मध्ये प्रदर्शित झाला होता. मेननचा हा पहिला फिचर चित्रपट होता. या चित्रपटाचे त्याने जोरदार प्रमोशन केले होते. मात्र चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई केली नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 22, 2019 1:38 pm

Web Title: manju warrier files complaint against shrikumar menon alleging danger to life avb 95
Next Stories
1 Video: ‘रात्रीस खेळ चाले २’च्या सेटवर शेवंताची चिकन पार्टी
2 ”पैसा, प्रेम सगळंच गमावलं होतं”; जेव्हा परिणीतीने केला होता नैराश्याबाबत खुलासा
3 अभिजित बिचुकलेंचा ठाकरेंवर गंभीर आरोप; म्हणाले…
Just Now!
X