News Flash

मनोज बायपेयी उलगडणार रहस्य; “सायलेंस-कॅन यू हिअर ईट” सिनेमाचा ट्रेलर रिलीज

26 मार्चला झी5 वर होणार प्रदर्शित

बॉलिवूड अभिनेता मनोज बाजपेयी सध्या चांगलाच चर्चेत आला आहे. मनोजला नुकतीच करोनाची लागण झाली आहे. त्यानंतर तो होम क्वारंटाईनमध्ये स्वत:ची काळजी घेतोय. यातच मनोजच्या ‘साइलेंस कॅन यू हियर इट’ या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आहे.

‘साइलेंस कॅन यू हियर इट’ या ट्रेलरला चाहत्यांची मोठी पसंती मिळताना दिसतेय. या सिनेमात मनोज बाजपेयी एका पोलिसाच्या भूमिकेत झळकणार आहे. ओटीटी प्लॅटफॉर्म झी5 वर हा सिनेमा 26 मार्चला प्रदर्शित होणार आहे.

या सिनेमात मनोज बायपेयीसोबतच अभिनेत्री प्राची देसाई आणि अर्जुन माथुर यांची प्रमुख भूमिका आहे. या सिनेमात मनोज बायपेयी एसीपी वर्मा या एका तापट पोलिस ऑफिसरची भूमिका साकारतोय. एका मृत्यूचं गूढ उकलण्यासाठी त्याची टीम कसे प्रयत्न करते याची झलक सिनेमाच्या ट्रेलरमध्ये पाहायला मिळतेय. त्याचसोबत या सिनेमामध्ये दमदार अ‍ॅक्शन ड्रामा आणि सस्पेंस देखील पाहायला मिळणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Manoj Bajpayee (@bajpayee.manoj)

मनोज वाजपेयीने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर या सिनेमाचा ट्रेलर चाहत्यांसोबत शेअर केला आहे.

मनोज बाजपेयीच्या ‘फॅमिली मॅन-2’ या वेब सीरिजच्या प्रदर्शानाची सध्या प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे. फेब्रुवारीमध्ये ही वेब सीरिज रिलीज होणार होती. मात्र तांडवच्या वादामुळे ‘फॅमिली मॅन-2’ चं प्रदर्शन पुढे ढकलण्यात आलं. त्याचसोबत ‘डिस्पॅच’ या सिनेमातून झळकणार आहे. मात्र याच सिनेमाच्या शूटिंगदरम्यान मनोजला करोनाची लागण झाल्यानं काही दिवसांसाठी शूटिंग थांबवण्यात आलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 17, 2021 11:20 am

Web Title: manoj bajpais silence can you hear it trailer release parachi desai will play cop kpw 89
Next Stories
1 लोकांच्या नजरेत यावं म्हणून ‘ते’ चित्रपट केले होते, बॉबी देओलचा खुलासा
2 Birthday Special : श्वेता बच्चनसाठी आमिर खान लिहायचा पत्र
3 20 वर्षानंतर ‘गदर’ सिनेमाचा सिक्वल; ‘हा’ चिमुकला झळकणार मुख्य भूमिकेत
Just Now!
X