सोमवारी ६७ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा झाली. दिल्लीतील नॅशनल मीडिया सेंटरमध्ये या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. सुरुवातीला हे पुरस्कार गेल्या वर्षी मे महिन्यात देण्यात येणार होता पण कोरोनाव्हायरस साथीच्या आजारामुळे अनिश्चित काळासाठी विलंब झाला. सहा सदस्यांच्या ज्यूरीने पुरस्कारासाठी २०० हून अधिक चित्रपट पाहिले.
धनुष याला असुरनमधील अभिनयासाठी आणि मनोज बाजपेयी याला भोसले या चित्रपटातील त्याच्या भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. याआधी पिंजर या चित्रपटासाठी बाजपेयीला स्पेशल ज्युरी पुरस्कार आणि सत्या या चित्रपटासाठी बेस्ट सपोर्टिंग अॅक्टरचा पुरस्कार प्राप्त झाला होता.
भोसले हा मुंबई पोलिसात हवालदार आहे. तो एका मोडकळीस आलेल्या चाळीत राहतो. तो आणि त्याचा एकटेपणा याचे चित्रण करण्यात आले आहे. मुंबई पोलिसातून निवृत्त झाल्यावर आपली सेवा वाढविण्याविषयी तो कधीकधी आपल्या माजी वरिष्ठांशी भेटतो. या भोसले याच्या आयुष्यात घडणारे प्रसंग चित्रित करण्यात आले आहेत. मनोज बाजपेयी या हरहुन्नरी कलाकाराने अश्या व्यक्तिरेखा साकारण्यात आपला हातखंडा आहे हे पुन्हा एकदा सिध्द केलं आहे. चित्रपटात गणेश उत्सवाची तयारी ही पार्श्वभूमी घेण्यात आली आहे.
असुरन चित्रपट हा शिवसॅमी आणि त्याच्या कुटुंबाच्या संघर्षांचा इतिहास आहे. इतर कोणत्याही वेत्रीमारन चित्रपटाप्रमाणेच असुरान हा चित्रपट आहे. चित्रपटात धनुष अगदी व्यक्तिरेखेला अनुसरून वावरताना दिसतो.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on March 22, 2021 6:16 pm