News Flash

The Family Man 2: सीरिजच्या रिलीजपूर्वी मनोज वाजपेयीची इमोशनल पोस्ट; “आपल्यापैकी असा कुणा नाही ज्याने…”

करोना काळात हिरोप्रमाणे काम करणाऱ्या फ्रंटलाइन वर्कर्सचे मानले आभार

अ‍ॅमेझॉन प्राइमवरील बहूप्रतिक्षित वेब सीरिज ‘द फॅमिली मॅन’ चा दुसरा सीजन आज (३ जून) मध्यरात्री स्ट्रीम करण्यात येणार आहे. जवळजवळ दीड वर्षाच्या प्रतिक्षेनंतर प्रेक्षकांना या सीरिजचा दुसरा सीजन पहायला मिळणार आहे. या सीरिजच्या दुसऱ्या सीजनची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. अखेर प्रेक्षकांची प्रतिक्षा आज रात्री संपणार आहे. ही सीरिज स्ट्रीम होण्यासाठी काही तास शिल्लक असताना यात श्रीकांत तिवारीची मुख्य भूमिका साकारणारा अभिनेता मनोज वाजपेयी याने सोशल मीडियावर एक इमोशनल पोस्ट शेअर केली आहे.

अभिनेता मनोज वाजपेयी याने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर ही पोस्ट शेअर केली आहे. यात त्याने लिहिलंय, “अखेर…तो दिवस आलाच…आम्हा कलाकारांकडे सागंण्यासाठी एक कहाणी असते…प्रत्येक प्रोजेक्ट्समध्ये त्यांचा चढ-उतार होत असतो. आमच्यासाठी ‘द फॅमिली मॅन २’ खूपच आव्हानात्मक ठरला. सध्या आपल्या सर्वांसाठी खूपच कठिण काळ सुरूये. आपल्यापैकी असा कुणीच नाही ज्याला नुकसान किंवा कष्ट झाले नसतील…एकीकडे आपण व्यक्ती गमावल्याचं दुःख भोगतोय…तर दुसरकीडे अशा कठिण काळात अगदी हिरोप्रमाणेच काम करणाऱ्या फ्रंटलाइन वर्कर्सचे आम्ही आभारी आहोत..जे लागोपाठ न थकता काम करत आहेत.”

यापुढे बोलताना मनोज वाजपेयी म्हणाला, “आम्हा सर्वांसाठी सकारात्मक आणि आशावादी राहणं खूपच अवघड गेलं. ज्याआधारे आम्ही टिकू शकलो ते तुमच्याकडून मिळत असलेलं प्रेम आणि प्रसंशेमुळेच. एक महामारी आणि दुसरं लॉकडाउनमध्ये काम करत असलेल्या आमच्या जबरदस्त स्टार कास्ट, क्रू आणि प्राइम वीडियो टीमचे सुद्धा खूप आभारी आहोत, ज्यांना या कठिण काळात आम्हाला साथ दिली.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Manoj Bajpayee (@bajpayee.manoj)

या पोस्टमध्ये पुढे लिहिताना मनोज वाजपेयी म्हणाला, “सीरिजचा दुसरा सीजन मध्यरात्री स्ट्रीम होईल…पण एक गोष्टी खरी आहे की ‘द फॅमिली मॅन २’ आता तुम्हा सर्व प्रेक्षक आणि फॅन्सची आहे…आम्हाला जे तुमच्याकडून प्रेम मिळतंय, त्यासाठी कायम तुम्हा सर्वांचा आभारी आहे.”

‘द फॅमिली मॅन २’ या सीरिजचं दिग्दर्शन सुपर्ण एस वर्मा यांनी केलं आहे. तर राज अ‍ॅण्ड डीके हे या सीरिजचे निर्माते आहेत. या सीरिजमध्ये अभिनेता मनोज वाजपेयी यांच्यासोबत शारिब हाशमी आणि सनी हिंदूजा हे मुख्य भूमिकेत झळकणार आहे. अभिनेत्री सामंथा अक्कीनेनी ही रिबेल संघटनेची सैनिक दाखवण्यात आलेली आहे. या सीजनमध्ये तिची मुख्य खलनायिकेची भूमिका असणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 3, 2021 10:49 pm

Web Title: manoj bajpayee get emotional ahead of the family man season 2 release remembering loss of lives during pandemic prp 93
Next Stories
1 टॉपलेस फोटोवर येणाऱ्या विचित्र कमेंट्समुळे टीना दत्तने उचललं हे पाऊल; ट्रोलर म्हणाला, “ताई, माफ करा”
2 आमिर खानच्या मुलीचा बॉयफ्रेंडसोबतचा व्हिडीओ व्हायरल; वडिलांच्या फिटनेस ट्रेनरसोबत आयराचं अफेअर
3 वाजिद खानच्या पत्नीनं १६ कोटी रुपयांच्या संपत्तीसाठी ठोठावला न्यायालयाचा दरवाजा
Just Now!
X