News Flash

Video: ‘द फॅमिली मॅन २’ नवा मजेशीर प्रोमो प्रदर्शित

सध्या हा प्रोमो चर्चेत आहे.

photo web

सध्या सोशल मीडियावर ‘द फॅमिली मॅन २’ ही वेब सीरिज चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी या सीरिजचा ट्रेलर प्रदर्शित झाला होता. त्यानंतर चाहत्यांमध्ये सीरिजबाबतची उत्सुकता पाहायला मिळाली. या सीरिजमध्ये अभिनेता मनोज वाजपेयी मुख्य भूमिकेत दिसणार आहे. आता ‘द फॅमिली मॅन २’चा एक नवा प्रोमो शेअर करण्यात आला आहे.

सध्या सोशल मीडियावर ‘द फॅमिली मॅन २’चा मजेशीर प्रोमो चर्चेत आहे. या प्रोमोमध्ये श्रीकांत तिवारी म्हणजेच अभिनेता मनोज वाजपेयी एक डेस्क जॉब करत असल्याचे दिसत आहे. त्याचा बॉस त्याच्यावर कामाचं प्रचंड प्रेशर टाकत आहे. त्याचा बॉस त्याला ‘मिनिमम गाय’ (Minimum Guy) असे बोलून धारेवर धरत असल्याचे प्रोमोमध्ये दिसत आहे.

आणखी वाचा : हुश्श! ‘द फॅमिली मॅन २’चा ट्रेलर अखेर प्रदर्शित; ‘या’ दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला

रोमांचपूर्ण ट्विस्‍ट्स आणि अनपेक्षित क्‍लायमॅक्‍स असलेल्‍या ‘द फॅमिली मॅन’ या सीरिजच्या आगामी सीझनमध्ये श्रीकांतच्‍या दुहेरी विश्‍वांची लक्षवेधक झलक पाहायला मिळणार आहे.‘द फॅमेली मॅन 2’ ही सीरिज १२ फेब्रुवारी २०२१ रोजी अॅमेझॉन प्राइमवर या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार होती. पण करोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली होती. आता ही सीरिज ४ जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सीरिजच्या माध्यमातून दाक्षिणात्य अभिनेत्री समंथा अक्किनेनी हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण करणार आहे. मनोज वाजपेयी आणि समंथासोबत प्रियामणि, शारिब हाशमी, सीमा बिस्वा, दर्शन कुमार, शरद केळकर, सनी हिंदुजा, श्रेया धन्वंतरी, शहाब अली, वेदांत सिन्हा आणि महक ठाकूर हे कलाकार महत्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 25, 2021 4:22 pm

Web Title: manoj bajpayee samantha akhineni the family man 2 new promo release avb 95
Next Stories
1 सुष्मिता सेननं दिली गोड बातमी; शेअर केली भली मोठी स्पेशल पोस्ट
2 जान कुमार सानूने शेअर केले बॉडी ट्रान्सफॉर्मेशनचे फोटो; म्हणाला, “धन्यवाद एजाज खान, मला त्रास दिल्याबद्दल!”
3 डॉ. अजित कुमार देव आणि डिंपलची लगीनघाई
Just Now!
X