काही दिवसांपूर्वी मराठी चित्रपटसृष्टीमधील अतिशय लोकप्रिय अभिनेत्री मानसी नाईकने बॉयफ्रेंड प्रदीप खरेरासोबत लग्न बंधनात अडकली. मानसीच्या लग्नातील काही खास फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. लग्नानंतर मानसी प्रदीपच्या गावी फरीदाबादला गेली होती. आता ते दोघे मुंबईत परतले आहेत. दरम्यान मानसीने सोशल मीडियाद्वारे चाहत्यांना गूड न्यूज दिली आहे. त्या दोघांचा म्यूझिक अल्बम लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

मानसीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरल तिच्या म्युझिक अल्बमचा टीझर शेअर केला आहे. या अल्बमचे नाव ‘वाटेवरी मोगरा’ असे आहे. हा टीझर शेअर करत तिने ‘आमचे प्रेम गीत.. येणार लवकरच…’ या आशयाचे कॅप्शन दिले आहे. हे गाणे वैशाली सामंत आणि स्वप्नील बांदोडकरने गायिले आहे. आता चाहत्यांमध्ये मानसी आणि प्रदीपच्या अल्बमबाबत उत्सुकता पाहायला मिळते.

आणखी वाचा- ‘या’ मराठमोळ्या अभिनेत्रींची लग्नानंतरची नावे माहितीयेत का?

गेल्या कित्येक दिवसांपासून मानसीच्या रिलेशनशीपविषयी चर्चा रंगत होती. पण नोव्हेंबर महिन्यात मानसीने तिचा प्रदीप खरेरा सोबत साखरपुडा झाल्याचे जाहीर केले. प्रदीप खरेरा व्यावसायिक बॉक्सर आणि मॉडेल आहे. १९ जानेवारी २०२१ रोजी मानसी आणि प्रदीपने लग्न केले. त्यांच्या लग्नातील फोटो सोशल मीडियावर चर्चेत होते.