News Flash

मानसी नाईकचा रोमँटिक अंदाज, नवा म्युझिक व्हिडीओ प्रदर्शित

सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.

काही दिवसांपूर्वी मराठी चित्रपटसृष्टीमधील अतिशय लोकप्रिय अभिनेत्री मानसी नाईक बॉयफ्रेंड प्रदीप खरेरासोबत लग्न बंधनात अडकली. मानसीच्या लग्नातील काही खास फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. लग्नानंतर मानसी प्रदीपच्या गावी फरीदाबादला गेली होती. आता ते दोघे मुंबईत परतले आहेत. नुकताच मानसीचा एक नवा म्युझिक व्हिडीओ प्रदर्शित झाला असून सोशल मीडियावर चर्चेत आहे.

मानसीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरल तिच्या म्युझिक व्हिडीओ शेअर केला आहे. या अल्बमचे नाव ‘वाटेवरी मोगरा’ असे आहे. या अल्बममध्ये मानसी आणि तिचा पती प्रदीप रोमँटिक अंदाजात दिसत आहेत. हा अल्बम वैशाली सामंत आणि स्वप्नील बांदोडकरने गायिला आहे. सागरिका दास यांनी हा म्युझिक व्हिडीओ दिग्दर्शित केला आहे. हा म्युझिक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत असून व्हायरल झाला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Manasi Naik Kharera (@manasinaik0302)

गेल्या कित्येक दिवसांपासून मानसीच्या रिलेशनशीपविषयी चर्चा रंगत होती. पण नोव्हेंबर महिन्यात मानसीने तिचा प्रदीप खरेरा सोबत साखरपुडा झाल्याचे जाहीर केले. प्रदीप खरेरा व्यावसायिक बॉक्सर आणि मॉडेल आहे. १९ जानेवारी २०२१ रोजी मानसी आणि प्रदीपने लग्न केले. त्यांच्या लग्नातील फोटो सोशल मीडियावर चर्चेत होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 12, 2021 4:59 pm

Web Title: mansi naik music video launch avb 95
Next Stories
1 ‘फॅमिली मॅन’ला करोनाची लागण; सिनेमाचं शूटिंग थांबलं
2 विजय तेंडुलकर मरणोत्तरही वादात! नाटकाचा प्रयोग झाला रद्द
3 सोशल मीडियावर ‘तूफान’ची चर्चा, फरहानचा अ‍ॅक्शन पॅक सिनेमा
Just Now!
X