05 March 2021

News Flash

Video: मानसी नाईकच्या आईने घेतला भन्नाट उखाणा, सोशल मीडियावर रंगली चर्चा

सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

काही दिवसांपूर्वी मराठी चित्रपटसृष्टीमधील अतिशय लोकप्रिय अभिनेत्री मानसी नाईकने साखरपुडा झाल्याची माहिती दिली. आता मानसीच्या लग्नविधींना सुरुवात झाली आहे. लग्नापूर्वी केल्या जाणाऱ्या विधींचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यातील एका व्हिडीओमध्ये मानसीची आई उखाणा घेताना दिसत आहे.

मानसी नाईकने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तिची आई उखाणा घेत आहे. हा व्हिडीओ शेअर करत मानसीने ‘आकाशाचा केला कागद, समुदाची केली शाई, तरीही आईचा महिमा, लिहीता येणार नाही.. आई माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे’ असे कॅप्शन दिले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Manasi Naik (@manasinaik0302)

आणखी वाचा- १०६ दिवस बिग बॉसच्या घरात राहिल्यानंतर या कारणामुळे अचानक एजाज खान पडला घराबाहेर

व्हिडीओमध्ये मानसी आई उखाणा घेत म्हणते, ‘माझी लेक आहे पडद्यावर चमचमणारी चांदणी, लग्नघटीका समीप आली, गाऊ आनंदाची गाणी, गृहमुखाचे दिवस सांगते राजन माझे राजा आणि मी त्यांचीच राणी.’

आणखी वाचा- ‘कलाकार म्हणून नाइट शिफ्टमध्ये काम करणे…’, कंगनाचे ट्वीट व्हायरल

गेल्या कित्येक दिवसांपासून मानसीच्या रिलेशनशीपविषयी चर्चा रंगत होती. पण नोव्हेंबर महिन्यात मानसीने तिचा प्रदीप खरेरा सोबत साखरपुडा झाल्याचे जाहीर केले. प्रदीप खरेरा व्यावसायिक बॉक्सर आहे. १९ जानेवारी २०२१ रोजी मानसी आणि प्रदीप विवाहबद्ध होणार आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 18, 2021 1:40 pm

Web Title: mansi naiks mother took ukhana video viral avb 95
Next Stories
1 ‘कलाकार म्हणून नाइट शिफ्टमध्ये काम करणे…’, कंगनाचे ट्वीट व्हायरल
2 VIDEO: नोरा फतेही झाली शेफ; जेवण करताना पदार्थाला लागली आग
3 १०६ दिवस बिग बॉसच्या घरात राहिल्यानंतर या कारणामुळे अचानक एजाज खान पडला घराबाहेर
Just Now!
X