02 July 2020

News Flash

‘मान्यवर’च्या जाहिरातीत झळकणार ‘हा’ नवा चेहरा, देणार विराटला टक्कर

हा नवा चेहरा बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता आहे.

क्रिकेटपटू विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा अनेक प्रेमी युगुलांना ‘रिलेशनशिप गोल्स’ देत आहे. त्यांचा प्रत्येक फोटो सोशल मीडियावर क्षणार्धात चर्चेत येतो आणि व्हायरलही होतो. ‘मान्यवर’ या कपड्यांच्या ब्रँडसाठी विराटने बऱ्याच जाहिराती केल्या आहेत. या जाहिराती प्रेक्षकांना आवडल्यासुद्धा. आता विराटला टक्कर देण्यासाठी बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता सज्ज झाला आहे. ‘मान्यवर’च्या नव्या जाहिरातीत विराटची जागा अभिनेता कार्तिक आर्यनने घेतली आहे.

या जाहिरातीत कार्तिकचा लूक पाहून तरुणी त्याच्यावर घायाळ होतील यात काही शंका नाही. या जाहिरातीत ‘मान्यवर’ची संगतशीर कपड्यांची नवी संकल्पना मांडण्यात आली आहे. ‘ग्रूमस्क्वाड’ची ही संकल्पना सगळ्यांना आपलीशी वाटणारी आणि उत्साही आहे. याबद्दल कार्तिक म्हणाला, ‘चित्रपटात नवरदेवाच्या मित्राची भूमिका साकारल्यानंतर जाहिरातीतही ते साकारणं माझ्यासाठी मजेशीर बाब आहे. यात मजा आहे, मैत्री आहे, खोडकरपणा आहे. संपूर्ण ग्रूमस्क्वाडने एकासारखेच कपडे परिधान करून मित्राच्या लग्नात धमाल करणे, ही फारच छान बाब आहे. आता माझ्या ज्या मित्राचं लग्न ठरेल तेव्हा मी हेच करणार आहे.’

कार्तिकने ‘सोनू के टिटू की स्वीटी’ या चित्रपटात नवरदेवाच्या मित्राची भूमिका साकारली होती. त्याची ही भूमिका चांगलीच गाजली. त्यामुळे या जाहिरातीसाठी कार्तिक आर्यन योग्य व्यक्ती आहे, अशी प्रतिक्रिया मार्केटिंगचे एव्हीपी अविजीत धर म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 16, 2019 2:08 pm

Web Title: manyavar releases its new groom squad tvc featuring this famous actor instead of virat kohli ssv 92
Next Stories
1 हा आहे कतरिनाचा बर्थडे प्लॅन
2 किशोरी शहाणेंनी उलगडला मुलाच्या मॉडेलिंगचा प्रवास
3 नोरा फतेही सांगतेय आगीसोबत नाचण्याचा अनुभव
Just Now!
X